ETV Bharat / entertainment

BPBD Box Office Collection Day 20 : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा भारतातच नव्हे जगभरात डंका, 'इतक्या' कोटींची केली कमाई - दमदार कमाई

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट २०व्या दिवशी देखील चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने ५० कोटीच्या पलीकडे आकडा देशांतर्गत पार केला.

BPBD Box Office Collection Day 20
बाईपण भारी देवा कलेक्शन दिवस २०
author img

By

Published : Jul 20, 2023, 10:25 AM IST

मुंबई: 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर सध्या चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटात हिरो आणि हिरोईन नसताना हा चित्रपट दमदार कमाई बॉक्स ऑफिसवर करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी महिला प्रेक्षक तुडुंब गर्दी करत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हा चित्रपट जेवढा भारतात कमाई करत आहे तेवढाच जगभर देखील कमाई करत आहे. 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बुधवारी २०व्या दिवशी १.८५ कोटी कमाविले असून या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५७.२० कोटीपर्यत पोहचले आहे. या चित्रपटाने १०व्या दिवशी ६.६ कोटीची कमाई केली होती.

'बाईपण भारी देवा' : मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या १०-१५ वर्षांत एकापेक्षा एक उत्तम चित्रपट प्रदर्शित होत असल्याने आता मराठी चित्रपटसृष्टी मोठी भरारी घेत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील असे चित्रपट आहे ज्यांनी बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली या चित्रपटामध्ये दुनियादारी, सैराट, धर्मवीर, पावनखिंड, वेड, चंद्रमुखी, लय भारी या चित्रपटांनी खूप कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. आजही मराठीतला सर्वाधिक कमाईचा विक्रम 'सैराट' चित्रपटाच्या नावावर आहे. या पुर्वी रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटाने खूप जबरदस्त कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. आता 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट किती कमाई करेल हे काही दिवसात कळेल . हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, दुबई या देशांमध्येही चित्रपट प्रदर्शित झाला. निम्म्याहून अधिक चित्रपटगृहांतले शोज हाऊसफुल आहेत.

महिलावर्ग प्रेक्षक : या चित्रपट रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दिप्ती परब यांनी चांगला अभिनय केला आहे. चित्रपटगृहांत ६० ते ६५ टक्के महिला प्रेक्षकवर्ग येत असल्याचा अंदाज आहे. तसेच 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचे १४ हजारांहून अधिक शो सध्या सुरू आहेत. येणाऱ्या काळात ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट इतर प्रादेशिक भाषांत डब केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चित्रपटाची इथेच कमाई थांबली नाही हा चित्रपट आणखी जास्त कमाई करण्याची शक्यता आहे.

.

हेही वाचा :

  1. Rakhi Sawant : टोमॅटोच्या महागाईत राखी सावंतने योगी आदित्यनाथकडे केली अशी मागणी... वाचा
  2. Prabhas Project K first look : प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' लूकने दिले ट्रोलर्सना आमंत्रण, नेटिझन्सनी केली 'आदिपुरुष'शी तुलना
  3. Project K grand launch : 'प्रोजेक्ट के' च्या लॉन्चिंगला दीपिका पदुकोण मुकणार, वाचा खरे कारण..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.