ETV Bharat / entertainment

कौटुंबिक नात्याला फुटणारी नवी पालवी, 'बेबी ऑन बोर्ड’ ट्रेलर प्रदर्शित!

नव विवाहित दांपत्याच्या आयुष्यात बाळाच्या आगमनाची चाहूल ही आनंदाची बाब असते. याच विषयावरची एक कौटुंबिक कथा आपल्याला बेबी ऑन बोर्ड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नात्यातील गंमत दाखवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

'बेबी ऑन बोर्ड’ ट्रेलर प्रदर्शित!
'बेबी ऑन बोर्ड’ ट्रेलर प्रदर्शित!
author img

By

Published : Oct 22, 2022, 4:27 PM IST

मुंबई - हल्ली ऑफिसेसमध्ये महिलांना मातृत्वाच्या रजेसोबताच पुरुषांना पितृत्व रजा देण्याचा प्रघात पडला आहे. नजीकच्या काळात एकल कुटुंब व्यवस्था जन्माला आली त्यामुळे मूल जन्माला येताना नवरा बायकोची तारेवरची कसरत असते. त्यामुळे हल्ली प्रेग्नेंट ही फक्त होणारी आईच नसून होणारे बाबाही असतात म्हटलं जात. म्हणूनच तर म्हणतात ना ‘वी आर प्रेग्नेंट’. या नऊ महिन्यांचा आनंददायी प्रवास ते एकत्र करतात. मग तो व्यायाम असो, डाएट असो, डॅाक्टरची व्हिजीट असो किंवा मग डोहाळे जेवण असो. असाच गोड अनुभव पाहायला मिळणार आहे सागर केसरकर लिखित, दिग्दर्शित ‘बेबी ऑन बोर्ड’मध्ये. नुकताच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यात प्रतिक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

‘बेबी ऑन बोर्ड’बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ‘’ही एक धमाल सीरिज आहे. हलक्याफुलक्या विनोदाने भरलेली ही सीरिज प्रेक्षकांना विशेषतः तरूणाईला जास्त जवळची वाटेल. हल्लीच्या कपल्समध्ये प्रेग्नेंसीचा प्रवास एकत्र असतो आणि हा प्रवास ते मनापासून त्यांच्या पद्धतीने एन्जॅाय करतात. प्रेक्षकांना नेहमीचं काहीतरी मनोरंजनात्मक हवं असतं आणि प्रेक्षकांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. हा आशयही असाच आहे. सर्व कुटुंबानं एकत्र पाहावी, अशी ही सीरिज आहे.’’

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सीरिजमध्ये सिद्धार्थ आणि श्रुती यांच्या नात्याला फुटणारी नवी पालवी त्यांच्या आयुष्यात विविध बदल घडवताना दिसत असून प्रेग्नेंसीमध्ये श्रृतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून सिद्धार्थची धडपड, काळजी यात दिसत आहे. तिचे डाएट सांभाळण्यापासून ते डॅाक्टरकडे चेकअपला जाताना दीड लिटर पाणी पिऊन जायचे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्याचे लक्ष आहे आणि हे सगळे सांभाळताना या दोघांमध्ये होणारी लुटूपुटूची भांडणे सीरिजमध्ये अधिकच धमाल आणत आहेत. ही एक कौटुंबिक सीरिज असून ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

साईनाथ राजाध्यक्ष व बीना राजाध्यक्ष या सीरिजचे निर्माते असून अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत. 'बेबी ऑन बोर्ड' २८ ऑक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - नीरा आर्य मोशन पोस्टर लॉन्च प्रसंगी महिमा चौधरीने दिल्या दिवाळी शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.