मुंबई - बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या 'बबली बाऊन्सर' चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी (५ सप्टेंबर) रिलीज झाला आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मिल्की ब्युटी तमन्नाचा सुंदर आणि दमदार अवतार ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तमन्ना या चित्रपटात बाऊन्सरची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबरला रिलीज होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कॉमेडी आणि अॅक्शन दोन्ही पाहायला मिळत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एक मुलगा बाउन्सर म्हणून पाहिला जातो, पण इथे बबली बाउन्सर (तमन्ना भाटिया) भल्या भल्यांना झुकवताना दिसत आहे. फतेहपूर बेरीची रहिवासी असलेली बबली १० वी पासदेखील नाही.
बबलीत मुलींचे एकही चिन्ह दिसत नाही यामुळे बबलीची आई मात्र या नाराज आहे. येथे बबली बाऊन्सरच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर पेज 3 आणि फॅशन या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहेत. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
काय आहे चित्रपटाची कथा? - बबली बाउंसर या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर हा चित्रपट दिल्लीच्या गावाजवळील फतेहपूर बेरीचा आहे. बबलीच्या वडिलांची भूमिका करणारा अभिनेता सौरभ शुक्ला उत्कृष्ट हरियाणवी बोलताना दिसत आहे. सौरभ बबलीला रिंगणात खूप ट्रेनिंग देतो. इकडे बबलीच्या आईला मात्र तिच्या लग्नाची काळजी वाटते.