ETV Bharat / entertainment

Babil khan : इरफान खान यांच्या निधनानंतर बाबील म्हणाला- मी माझे जग गमावले - 45 days after father irrfan khan demise

वडील इरफान खान यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगा बाबील खान (babil khan) एक किस्सा शेअर करत म्हणाला, वडील इरफान खान यांच्या जयंतीदिनी अभिनेता बाबीलला ते 45 दिवस (45 days after father irrfan khan demise) आठवले, जेव्हा वडील इरफान खानने जगाचा निरोप घेतला होता. बाबीलने सांगितले की, त्याच्या वडिलांच्या निधनानंतर, त्याचे वडील शूटिंगसाठी गेले होते, असे सांगून तो 45 दिवस स्वतःचे सांत्वन करत होता. बाबिलने स्वतःला 45 दिवस एका खोलीत (babil khan locked himself inside room) कोंडून ठेवले.

Babil khan
इरफान खान यांच्या निधनानंतर बाबील म्हणाला...
author img

By

Published : Jan 8, 2023, 1:16 PM IST

हैदराबाद : अभिनय तर प्रत्येकजण करतो, पण जो आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना जाणवतो की, पडद्यावर त्याच्या डोळ्यांसमोर घडणारी कथा… फक्त एक कथा नाही… तर घडणारी खरी गोष्ट आहे. त्याच्या आयुष्यातील ही एक घटना आहे. इरफान खान आपल्या अभिनयाने काहीतरी अप्रतिम करायचा. अभिनयाची सरमिसळ करणार्‍या अभिनेत्यांपैकी तो एक होता, पण आता त्याचे आणखी चित्रपट पाहणे आपल्या नशिबी नाही. 29 एप्रिल 2020 रोजी जगाचा निरोप घेणारा अभिनयाचा 'टर्मिनेटर' इरफान खानची 7 जानेवारीला बर्थ अ‍ॅनिवर्सरी झाली. अशा परिस्थितीत त्याचे चाहते आणि सेलिब्रिटी त्याला मिस करत आहेत. या दिवशी इरफानचा मुलगा बाबील यानेही असाच एक किस्सा शेअर केला आहे.

ते 45 दिवस आठवत बाबील म्हाणाला : मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबीलने ते 45 दिवस (45 days after father irrfan khan demise) आठवले आणि म्हणाला, 'वडिलांचे निधन झाले... यावर विश्वास ठेवायला मला वेळ लागला, जेव्हा एक आठवडा गेला तेव्हा मला वाटले की, मी माझे जग गमावले आहे. मी हळूहळू वाईट स्थितीत जाऊ लागलो. मी स्वतःला 45 दिवस खोलीत कोंडून (babil khan locked himself inside room) ठेवले होते. बाबीलला जेव्हा विचारण्यात आले की, तो वडिलांच्या अनुपस्थितीतून कसा सावरतो आहे, तेव्हा बाबील म्हणाला, 'मी इथे स्वतःला सांगत होतो की वडील एका लांबच्या शूटसाठी बाहेर गेले आहेत आणि शूट संपवून ते परत येतील, पण हळू हळू मला कळायला लागले की मी माझा जिवलग मित्र गमावला होता. मी तुटत होतो, माझे वडील मला प्रत्येक गोष्टीत सकारात्मक ऊर्जा देत होते.

बाबील खानबद्दल जाणून घ्या : इरफान खानचा मोठा मुलगा बाबील खान याने गेल्या वर्षी (2022) 'काला' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट (OTT) वर प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये बाबीलने एका आशादायी गायकाची भूमिका केली होती. बाबीलच्या या चित्रपटाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले. बाबीलचा पुढचा प्रोजेक्ट म्हणजे 'द रेल्वे मॅन' ही वेबसिरीज. ही मालिका मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या 'भोपाळ गॅस घटने'वर आधारित आहे. शिव रवैल या मालिकेची तयारी करत आहेत. या मालिकेत उत्तम अभिनेता आर. माधवन, केके मेनन आणि दिव्येंदू शर्मा हे बाबीलला अभिनयात मदत करतील.

चाहत्यांच्या मनात कायम अजरामर : अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना इरफान खानने फिल्म इंडस्ट्रीत येण्याचे धाडस केले. अगदी बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. आज जरी इरफान आपल्यात नसला, तरी त्याच्या दमदार अभिनय आणि संवादशैलीमुळे चाहत्यांच्या मनात कायम अजरामर आहे. मीरा नायर यांच्या ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. त्याची छोटीशी भूमिका असलेल्या या चित्रपटाला जागतिक स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले, तर ऑस्करसाठी नामांकनदेखील मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.