ETV Bharat / entertainment

Prabhas Instagram Account : अभिनेता प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट - प्रभास इंस्टाग्राम अकाउंट झाले गायब

Prabhas Instagram Account : अभिनेता प्रभासचे इंस्टाग्राम अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट करण्यात आले आहे. 'सालार' या मोस्ट अवेटेड चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आलेल्या या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.

Prabhas Instagram Account
प्रभासचं इन्स्टाग्राम अकाउंट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 7:50 PM IST

मुंबई - Prabhas Instagram Account : साऊथ अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी 'सालार' चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता प्रभासबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रभासचे इंस्टाग्राम अकाउंट एका रात्रीतच अचानक गायब झाले आहे. यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता सध्या प्रभासचे चाहते प्रचंड तणावात आहेत. प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्यानं चाहते दु:खी झाले आहेत. प्रभासचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, त्यामुळे अनेकांना त्याच्या चित्रपटांविषयी खूप उत्सुकता असते. प्रभास अनेकदा त्याचे फोटो आणि चित्रपटांविषयी प्रत्येक अपडेट त्याच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

प्रभास इंस्टाग्राम अकाउंट झाले गायब : प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट गायब होताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. चाहत्यांचा असा अंदाज आहे की कदाचित त्याने स्वतः अकाउंट निष्क्रिय केले असेल किंवा कोणीतरी त्यांचे अकाउंट हॅक करून हटवले असेल. काही लोक यामागचे कारण ग्लोबल हॅकिंगला देत आहेत. प्रभासचे अकाउंट हॅक करून डिलीट करण्यात आल्याचे लोकांचे म्हणणे आहे. सध्या या संदर्भात प्रभास किंवा त्याच्या टीमकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. दरम्यान प्रभासचा 'सालार' चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, मीनाक्षी चौधरी, जगपती बाबू आणि याशिवाय अनेक कलाकार दिसणार आहेत.

प्रभासचे वर्क फ्रंट : प्रभास दिग्दर्शिक मारुतीच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय तो 'कल्की 2898 एडी'मध्येही दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे नाव आधी 'प्रोजेक्ट के' असे होते. यापूर्वी प्रभास हा 'आदिपुरुष'मध्ये दिसला होता. हा चित्रपट त्याचा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत क्रिती सेनॉन, सैफ अली खान, देवदत्त नागे, वत्सल शेठ, सनी निज्जर, तेजस्विनी पंडित आणि तेजस्विनी पंडित हे कलाकर दिसले होते. हा चित्रपट ओम राऊत दिग्दर्शित होता.

हेही वाचा :

  1. Maadi Song Out : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं 'हे' गाणं; पाहा व्हिडिओ...
  2. Priyanka Chopra and Nick jonas : निक जोनासनं पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीसह इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर...
  3. Singham Again: दीपिका पदुकोणनं 'सिंघम अगेन'मधील शेअर केला लेडी सिंघमचा लूक, रणवीर सिंगनं 'ही' दिली प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.