ETV Bharat / entertainment

अवतार २ चित्रपटाने भारतात रचला इतिहास, ठरला हॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट - highest grossing movie of Hollywood

Avatar : The Way Of Water : अवतार 2 ने भारतात इतिहास रचला आहे. अवतार-2 ने कमाईच्या बाबतीत 'Avengers: Endgame' ला मागे टाकत मोठा विक्रम केला आहे.

अवतार २ चित्रपटाने भारतात रचला इतिहास,
अवतार २ चित्रपटाने भारतात रचला इतिहास,
author img

By

Published : Jan 9, 2023, 4:53 PM IST

मुंबई - मेगाब्लॉकबस्टर हॉलिवूड चित्रपट 'टायटॅनिक' फेम दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनने अखेर 'अवतार 2' या जादुई चित्रपटात आपल्या करिष्माई कॅमेरा वर्कने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. कारण देशात आणि जगात 'अवतार-2'च्या कमाईचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर (2022) रोजी प्रदर्शित झाला आणि अजूनही प्रेक्षकांना त्याच्या निळ्या दुनियेत घेऊन जात आहे. खरंतर, 'अवतार-2' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाईचा मोठा इतिहास रचला आहे. हा चित्रपट भारतात हॉलिवूडचा नंबर वन चित्रपट ठरला आहे. कसे ते जाणून घेऊया....

'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा - तुम्ही रुसो ब्रदर्स (अँथोनी रुसो आणि जो रुसो) यांचे नाव ऐकले असेलच, होय तेच ज्यांनी ब्लॉकबस्टर हॉलीवूड चित्रपट 'अॅव्हेंजर्स एंडगेम' बनवला. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 438 कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले होते.

पण आता 'अवतार-2' ने या चित्रपटाला भारतीय बॉक्स ऑफिसवर धूळ चारली आहे, कारण 'अवतार-2' ने अवघ्या 24 दिवसांत भारतात 454 कोटींचे ग्रॉस कलेक्शन जमवले असून चित्रपटाची थेट कमाई 373.25 कोटी रुपये आहे.

'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' भारतात 2019 साली प्रदर्शित झाला आणि आजपासून तीन वर्षांपूर्वी (म्हणजे कोरोना विषाणूच्या लाटेपूर्वी) चित्रपटाने भारतात 372.22 कोटी रुपयांची कमाई केली. अशा परिस्थितीत 'अवतार-2' ने 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम'ला मागे टाकत हॉलिवूडचा भारतातील नंबर वन चित्रपटाचा किताब पटकावला आहे.

अवतार-2 ला भारतात खूप स्क्रीन मिळाले - 'अवतार-2'साठी देशातील आणि जगातील प्रेक्षकांना 13 वर्षे वाट पाहावी लागली. 2009 मध्ये 'अवतार' रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत हा चित्रपट भारतात 4 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात 1.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच 14 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.

भारतात सर्वाधिक कमाई करणारे हॉलीवूड चित्रपट - 'अवतार-2'पूर्वी या पाच हॉलिवूड चित्रपटांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड बनवले होते, ज्यामध्ये 'अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम' (373.22), 'अ‍ॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' 2018 (227.43) मध्ये रिलीज झाले होते. 2021 मध्ये 'स्पायडर-मॅन नो वे होम' (218.41), आणि 2016 मध्ये 'द जंगल बुक' (188.0). अवतारच्या कमाईने रचलेला हा नवा इतिहास आगामी काळात लवकर मोडला जाईल असे तरी सध्या बिल्कुल दिसत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.