मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ( James Cameron ) हॉलिवूड चित्रपट 'अवतार'चा ( Avatar ) सीक्वल 'अवतार द वे ऑफ वॉटर' ( Avatar the Way of Water ) गेल्या १६ डिसेंबरला जगभर रिलीज झाला. या चित्रपटाला जगभरात जबरदस्त प्रतिसाद मिळत असून भारतातही चित्रपट तुफान कमाई करत आहे. सुमारे २१०० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या 'अवतार: द वे ऑफ वॉटर' चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर पहिल्या विकेंडला १६० कोटींची कमाई केली आहे.
-
#AvatarTheWayOfWater grosses
— Ramesh Bala (@rameshlaus) December 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
₹ 160 crs at the India 🇮🇳 Box Office for the 3 days opening weekend.. pic.twitter.com/wK7ChC9xvk
">#AvatarTheWayOfWater grosses
— Ramesh Bala (@rameshlaus) December 19, 2022
₹ 160 crs at the India 🇮🇳 Box Office for the 3 days opening weekend.. pic.twitter.com/wK7ChC9xvk#AvatarTheWayOfWater grosses
— Ramesh Bala (@rameshlaus) December 19, 2022
₹ 160 crs at the India 🇮🇳 Box Office for the 3 days opening weekend.. pic.twitter.com/wK7ChC9xvk
ट्रेड विशेषज्ञ रमेश बाला यांनी आपल्या ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
तीन दिवसांत १६० कोटींचा गल्ला : भारतामध्ये ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ ने फक्त दोन दिवसांत १०० कोटींचा पल्ला गाठला ( Avatar Earned 100 Crores In Two Days ) आणि तिसऱ्या दिवशी तब्बल १६० कोटीपर्यंत छप्पार फाड कमाई केली आहे. हा चित्रपटअजून अनेक विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ ने १५०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे. या चित्रपटाला अप्रतिम रिव्ह्यूज मिळाले आहेत. ‘अ व्हिज्युअल ट्रीट’, ‘सुपरसाईज्ड ब्लॉकबस्टर’, ‘अप्रतिम सिनेमॅटिक जर्नी ’ सारख्या कॉमेंट्समुळे सकारात्मक शब्दांची माऊथ पब्लिसिटी मिळत आहे. अवतार द वे ऑफ वॉटर’ इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब करण्यात आला आहे.
जगभरातील बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाल्यास, 'अवतार 2' चं कलेक्शन पहिल्या वीकेंडमध्ये 450 मिलियन डॉलरच्या जवळपास जाणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणारा ‘अवतार 2’ हा पहिला चित्रपट ठरला आहे.
आणखीही सिक्वल बनणार.. ‘अवतार 2’ रिलीज झाला आहे. ‘अवतार 3’ चित्रपटाचे शूटिंगही जवळपास पूर्ण झाले आहे. ‘अवतार 3’ डिसेंबर 2024 मध्ये रिलीज होईल. आगामी काही वर्षात चित्रपटाचा चौथा आणि पाचवा सिक्वेल आणले जाणार आहेत.
हेही वाचा - फुटबॉल लीजेंड वेन रुनीसोबत शाहरुख खानची सिग्नेचर पोज, फिफा वर्ल्ड कप प्रसारणात पठाणचे प्रमोशन