मुंबई - ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आज 89 वा वाढदिवस आहे. आपल्या जादुई आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या आशाताई अगदी लहानपणापसूनच गायनाच्या क्षेत्रात आहेत. सुरेल आवाजाने समृद्ध असलेल्या आशा ताईंनी संगीताच्या दुनियेत नाव कमवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. पण त्यांच्याकडे आणखी एक महत्त्वाचं कौशल्य होतं ते म्हणजे स्वयंपाक करणे. यातही आपण यश मिळवू शकतो अशा विश्वास त्यांना होता. आपल्यातल्या काहीजणांना हे माहिती असेल की आशाताई परदेशात रेस्टॉरंट्स चालवतात.
आशा भोसले यांचा जन्म 1933 मध्ये सांगलीमध्ये झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गायनाला सुरूवात केली होती. 1943 साली वयाच्या 10 व्या वर्षी 'माझा बाळ' या मराठी चित्रपटात त्यांनी पहिले गाणे गाऊन गायन कलेच्या जगात पदार्पण केले. आशा ताईंनी 1948 साली हंसराज बहलच्या चुनरिया या चित्रपटातील 'सावन आया' हे हिंदी चित्रपटासाठी गीत गायले. तेव्हापासून आज वयाच्या ८९ पर्यंत आशाताई संपूर्ण जागाला आपल्या जादुई आवाजाने मंत्रमुग्ध करत आल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आशा भोसले यांनी 1948 पासून हिंदी चित्रपटांमध्ये गाणे सुरू केले आणि त्यानंतर त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली. आशा ताईंना फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आतापर्यंत 7 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. आशा भोसले यांना 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवीसिंह पाटील यांच्या हस्ते 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आशा भोसले यांनी 'माई' चित्रपटातही काम केले आहे. त्याच्या कामगिरीचे कौतुकही झाले. 22 भाषांमध्ये 11000 हून अधिक गाणी गाऊन आशा ताईंनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा २०२१ सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आशा भोसले यांना मिळाला होता.
गायनासोबतच आशा भोसले यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या हाताचे कढई मटण आणि बिर्याणीचा स्वाद चाखला आहे. एका संवादादरम्यान आशा भोसले यांनी सांगितले होते की, ऋषी कपूर यांना त्यांच्या हातचा शामी कबाब, कढईतले मटण मांस आणि दाळ खूप आवडायची.
आशा ताईंनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, जर त्यांची गायनातली कारकीर्द चमकली नसती तर त्यांनी स्वयंपाकात हात अजमावला असता.आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय जबरदस्त आहे. त्यांची दुबई आणि कुवेतमध्ये आशाझ नावाची रेस्टॉरंट्स आहेत. यामध्ये पारंपारिक भारतीय खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. त्यांची अबुधाबी, दोहा, बहरीन येथेही रेस्टॉरंट्स आहेत. रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांमध्ये आणि सजावटीमध्ये आशा ताई एक ताकद आहेत. त्यांनी सुमारे ६ महिने शेफला प्रशिक्षण दिले आहे.
हेही वाचा - Asha Bhosle Birthday: दिग्गज गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस.. घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन