मुंबई - Salar second song Qisson Mein released: सालार: भाग 1-सिझफायर मधील 'किस्सों में' हे दुसरं गाणं आज गुरुवारी लॉन्च करण्यात आलं. उद्या 22 डिसेंबरला चित्रपट रिलीज होणार असताना एक दिवस आधी नवं गाणं रिलीज करण्यात आलंय. चित्रपटाप्रमाणेच, हे गाणे तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये उपलब्ध केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हिंदीमध्ये रिलीज करण्यात आलेल्या या गाण्याचं शीर्षक 'किस्सों में' असे आहे. तर तेलुगूमध्ये प्राथिकदालो, कन्नडमध्ये प्राथिकथेय, मल्याळममध्ये प्राथिकरामो आणि तामिळमध्ये पलाकाधयिल असे शीर्षक देण्यात आले आहे. इंस्टाग्रामवर प्रोडक्शन बॅनर होंबळे फिल्म्सने चित्रपटातील एका स्त्री पात्राच्या फोटोसह गाण्याची रिलीज तारीख आणि वेळ शेअर केली होती. त्यानुसार चार वाजता हे गाणं लॉन्च करण्यात आलं. विशेष म्हणजे हिंदीतील हे मंत्रमुग्ध करणारं गाणं लोकप्रिय गायिका रिया मुखर्जीने गायलं आहे.
लार्जर-दॅन-लाइफ पद्धतीने नायकांना प्रेझेन्ट करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेला प्रशांत नील रिबेल स्टार प्रभाससोबत असेच काम करण्याच्या तयारीत आहे. दिग्दर्शक कथेला पुढे घेऊन जाणाऱ्या सिग्नेचर साउंडट्रॅकसाठी ओळखला जातो. चित्रपटाच्या रिलीजच्या अनुषंगाने, हे दुसरे गाणे रिलीज करण्यात आलं आहे.
सालार चित्रपटाचे रवी बसरूर संगीतकार आहेत. पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, टिन्नू आनंद आणि श्रिया रेड्डी हे यातील प्रमुख कलाकार आहेत. आपल्या माहितीकरत सांगायचे तर सालारच्या हिंदी आवृत्तीतील 'सूरज ही छाँव बनके' या पहिल्या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हे गाणे प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन दोन मुख्य पात्रांच्यातील बंधुत्वाच्या नात्याभोवती फिरते.
या गाण्याला कन्नडमध्ये आकाशा गाडिया, मल्याळममध्ये सूर्यसंगम, तामिळमध्ये आगसा सूरियान आणि तामिळमध्ये आगसा सूरियान म्हणतात. तेलगू आवृत्तीमध्ये कृष्ण कांथ (केके) यांचे गीत आणि हरिणी इवातुरी यांचे गायन, रवी बसूर यांनी संगीत दिलेले आहे. रवीने सर्व भाषांसाठी संगीत लिहिले असले तरी गीतकार आणि गायक प्रत्येक भाषेसाठी जुळवून घेतले आहेत. मल्याळममध्ये, विजयालक्ष्मी मेटिनाहोल आणि किन्नल राज यांनी भूमिका घेतल्या आहेत; कन्नडमध्ये ऐरा उडुपी आणि मधुरकवी यांनी याची जबाबदारी घेतलीय. हिंदीमध्ये, रिया मुखर्जी यांनी त्यांचा आवाज दिला आहे.
हा बहुप्रतिक्षित चित्रपट खानसार या काल्पनिक शहराच्या पार्श्वभूमीवर सेट करण्यात आला आहे. हा प्रभास आणि प्रशांत नील यांच्यातील पहिला प्रकल्प आहे. प्रशांत नीलने यापूर्वी केजीएफ फ्रँचायझीसारखे जबरदस्त हिट चित्रपट दिले आहेत.
हेही वाचा -
1 अक्षय कुमार स्टारर 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3' अडचणीत
2 रणबीर कपूरनं न्यूयॉर्कमध्ये मिस्ट्री गर्लसोबत केला डिनर, फोटो व्हायरल
3. एरियल अॅक्शन थ्रिलर 'फायटर'च्या रिलीजपूर्वी दीपिका पदुकोणने घेतले तिरुपती बालाजीचं दर्शन