ETV Bharat / entertainment

आर्यन खान दिग्दर्शकिय पदार्पणासाठी स्क्रिप्टसह सज्ज, शाहरुखने दिल्या शुभेच्छा

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. यासाठी त्याने स्वतः कथा लिहिली असून स्क्रिप्ट पूर्ण झाल्याची पोस्ट त्याने सोशल मीडियावर लिहिली आहे. यानंतर मुलाचा अभिमान बाळगत शाहरुख व गौरी खान यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान
author img

By

Published : Dec 7, 2022, 9:36 AM IST

मुंबई - आर्यन खानने अलीकडेच दिग्दर्शनात पदार्पण करण्याची घोषणा केली आहे. यानंतर त्याचे वडील शाहरुख खानने त्याला शुभेच्छा देत भरभरुन आशीर्वादही दिले आहेत.

आर्यनने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सांगितले की त्याने त्याने त्याच्या पहिल्या दिग्दर्शनाच्या प्रकल्पासाठी लेखन पूर्ण केले आहे. यानंतर त्याचा्या कमेंट सेक्शनमध्ये शाहरुखने आपल्या मुलाला शुभेच्छा दिल्या.

स्क्रिप्टचा फोटो असलेल्या पोस्टला आर्यनने कॅप्शन दिले, "लेखन पूर्ण झाले...आता अॅक्शन म्हणण्यासाठी उतावीळ झालोय." पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये शाहरुखने लिहिले, "व्वा....विचार...विश्वास...स्वप्न पूर्ण झाले, आता हिंमत आहे....पहिल्यासाठी तुला शुभेच्छा. हे नेहमीच खास असते.. .."

आर्यनने त्याच्या वडिलांच्या कमेंटला उत्तर दिले, "धन्यवाद! सेटवर तुमच्या सरप्राईज व्हिजिटची वाट पाहत आहे." शाहरुखने त्याच्या नेहमीच्या बुद्धीने मग लिहिले, "मग दुपारच्या शिफ्ट्स ठेवाव्यात!! सकाळी नको." यानंतर आर्यनने त्याच्या वडिलांच्या विनंतीचे पालन करत लिहिले, "@iamsrk अर्थातच...फक्त रात्रीचे शूट." आर्यनची आई गौरी खान हिनेही लेकाचे कौतुक करत कमेंट केली आहे.

यापूर्वी 2019 मध्ये, शाहरुख डेव्हिड लेटरमॅनच्या टॉक शोमध्ये दिसला होता, तिथे त्याने त्याचा मुलगा आर्यनच्या करिअरच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगितले होते. 'माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन विथ डेव्हिड लेटरमॅन' या शोवर, शाहरुखने नामांकित होस्टला सांगितले की आर्यनला अभिनेता बनायचे नाही.

दरम्यान, शाहरुख खानची मुलगी सुहाना तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा - मलायका अरोराने केले तिच्या खासगी आयुष्यातील धक्कादायक खुलासे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.