ETV Bharat / entertainment

Aryan Khan dating Nora Fatehi : आर्यन खान नोरा फतेहीला डेट करतोय? व्हायरल फोटोंमुळे अफवांना पेव - आर्यन खान आणि नोरा फतेहीच्या डेटींग

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर जोर धरत आहेत. (Aryan Khan dating Nora Fatehi). मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईमधून नवीन वर्षाच्या पार्टीचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये आर्यन खान आणि नोरा फतेही दिसत आहेत.

Aryan Khan Nora Fatehi
आर्यन खान नोरा फतेही
author img

By

Published : Jan 4, 2023, 6:10 PM IST

हैदराबाद : नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी सर्व बॉलिवूड स्टार्स त्यांच्या आवडत्या डेस्टिनेशनवर गेले होते. शाहरुख खानचे कुटुंब हे अलिबागमध्ये नवीन वर्ष साजरे करून घरी परतले. खान कुटुंबियांच्या अलिबाग फार्महाऊसवरील न्यू इयर सेलिब्रेशनमध्ये शाहरुख, गौरी खान, सुहाना खान आणि अबराम खान दिसले, मात्र शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) कुठेच दिसला नाही. आता आर्यन खानच्या एका पार्टीचे फोटो समोर आले आहेत, जे न्यु इयर सेलिब्रेशनचे असल्याचे म्हटले जात आहे. या फोटोंमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सुद्धा दिसत आहे. आर्यन खान आणि नोरा फतेहीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. इंटरनेट वर आर्यन खान आणि नोरा फतेहीच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आले आहे. (Aryan Khan dating Nora Fatehi).

Aryan Khan dating Nora Fatehi
व्हायरल फोटो

दुबईमध्ये नवीन वर्षाचे स्वागत : मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खानने दुबईमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले. येथून एका पार्टीचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये आर्यन खान आणि नोरा फतेही दिसत आहेत. दोघांचे एकत्र फोटो नसले तरी नोरा आणि आर्यनसोबत फोटोत दिसणारे बाकीचे लोक सारखेच आहेत आणि लोकेशन सुद्धा तेच आहे. या पार्टीत पंजाबी सिंग हार्डी सिंधू देखील होता, परंतु याची कोणतीही पुष्टी नाही

Aryan Khan dating Nora Fatehi
व्हायरल फोटो

यूजर्स अशा कमेंट करत आहेत : या पार्टीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, नेटीजन्सनी आर्यन खान आणि नोरा एकमेकांना डेट करत असल्याची अफवा उठवली आहे. अनेक यूजर्स मजेशीर कमेंट करत आहेत तर अनेक यूजर्स नोरा-आर्यनच्या वयातील अंतरावर कमेंट करत आहेत. त्याचबरोबर एका यूजरने अनन्या पांडेचे आता काय होणार असे लिहिले आहे.

आर्यन खानची कारकीर्द : आश्चर्याचे म्हणजे आर्यन खान चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून नव्हे तर लेखक म्हणून करिअरची सुरुवात करणार आहे. आर्यन खानने त्याच्या पहिल्या प्रोजेक्टची स्क्रिप्ट तयार केली आहे. त्याने स्वतः त्याच्या प्रोजेक्टची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.