मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अनुष्का ही सोशल मीडियावर फार जास्त सक्रिय असते. बरेचदा ती तिचे आणि विराटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच या जोडप्याचे गेल्या महिन्यातील लंडनमधील काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोमध्ये हे जोडपे आपली लंडनमधील सुट्टी साजरी करताना दिसत आहे. दरम्यान, आता अनुष्काने तिचे लंडन व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या छोट्या कुटुंबासोबत दिसत आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ : गेल्या रविवारी, अनुष्काने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ क्लिप अपलोड केली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहले, 'मेजर मिसिंग - लंडन सिटी आणि कॉफी वॉक. बराचवेळ माझ्यासोबत राहिलेली कॉफी. क्लिपमध्ये, अनुष्का हातात कॉफी घेऊन लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे, याशिवाय विराट कोहली हा मुलगी वामिकासोबत मस्ती करताना दिसत आहे.
वामिकाची झलक दिसली : या व्हिडिओमध्ये अनुष्का डेनिम आउटफिटमध्ये दिसत आहे. काळा आणि पांढरा चष्मा, फ्लोरल प्रिंटेड पर्स, मिनरल मेकअपमध्ये ती फार सुंदर दिसत आहे. याशिवाय अनुष्काने यावर मोकळे केस सोडले आहेत. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि वामिकाची झलक दाखवण्यात आली आहे. दरम्यान, या व्हिडिओमध्ये विराट हा अनुष्काचे फोटो क्लिक करताना दिसत आहे. शेवटी, अनुष्का तिचा कॉफी कप डस्टबिनमध्ये टाकताना दिसली आहे. अनुष्काच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने लिहले, मला तुमची खूप आठवण येते तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहले की, अनुष्का ही पाकिस्तानची मम्मी आहे. अशा अनेक कमेंट या फोटोवर येत आहेत.
अनुष्का शर्माचा वर्क फ्रंट : अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अनुष्का झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हेही वाचा :