ETV Bharat / entertainment

Anushka Sharma Pregnant ? : विराट कोहलीच्या घरी पुन्हा हलणार पाळणा, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई - वामिका कोहली

Anushka Sharma Pregnant ? : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता हे स्टार कपल 'हम दो हमारे दो' म्हणत कुटुंब बनविणार आहे. अनुष्का ही दुसऱ्यांदा आई होणार आहे.

Anushka Sharma Pregnant
अनुष्का शर्मा प्रेग्नेंट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 12:37 PM IST

मुंबई - Anushka Sharma Pregnant ? : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या जोडप्याच्या घरात नवीन पाहुण्याचे लवकरच आगमन होणार आहे. वामिकानंतर आता हे कपल होणाऱ्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसापासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेली नाही. याशिवाय असेही म्हटलं जातंय की, अनुष्का आणि विराट नुकतेच मॅटर्निटी क्लिनिकमध्ये स्पॉट झाले होते. प्रेगनेंसीबाबत ते लवकरच घोषणा करतील असं आश्वासन देऊन पापाराझींना फोटो शेअर न करण्याची विनंती केली त्यांनी केली होती. सध्या अनुष्का सार्वजनिक कार्यक्रमापासून अंतर राखत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काचा दुसरा किंवा तिसरा महिना सुरू आहे.

वामिकाचा चेहरा लपविला होता : अनुष्का आणि विराटनं आपली मुलगी वामिकाचा चेहरा बऱ्याचं दिवस जगापासून लपविला होता. वामिकाचा चेहरा मीडियानं दाखवू नये, अशी विनंती या दोघांनी आधीच केली होती. विराटनं एका मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं की, 'आम्ही ठरवले आहे की जोपर्यंत ती स्वतःला समजत नाही आणि सोशल मीडियावर येण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही तिचा चेहरा दाखवणार नाही'. अनेकदा जेव्हा तिघेही एकत्र दिसतात तेव्हा पापाराझी वामिकासोबत असताना फोटो क्लिक करत नाही, जर फोटो क्लिक झाल्यास तिचा चेहरा दाखवत नाहीत. 2017मध्ये अनुष्का शर्मानं विराट कोहलीसोबत इटलीमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. हे खूप भव्य आणि शाही लग्न होत. या लग्नात काही सेलेब्रिटीनाचं आमंत्रण होतं.

अनुष्काचा आगामी चित्रपट : अनुष्काच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर ती बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. ती शेवटची 2018 मध्ये 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान आणि कतरिना कैफ हे देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर तिनं निर्माता म्हणून काम करायला सुरुवात केली. तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत 'बुलबुल' आणि 'पाताळ लोक' यासारखे प्रोजेक्ट बनवले गेले आहेत. दरम्यान अनुष्कानं प्रॉडक्शन हाऊस सोडलं आहे. तिचा भाऊ एकटाच या प्रॉडक्शन हाऊसला सांभाळत आहे. आता अनुष्का 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Latest 3 Flims Bo Collection : 'फुक्रे 3', 'चंद्रमुखी 2' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
  2. Jackie Shroff felt proud : 'गणपथ'चा टीझर पाहून जॅकी श्रॉफला वाटला मुलाचा अभिमान, लिहिली हृदयस्पर्शी चिठ्ठी
  3. Mission Raniganj : कोळशाच्या खाणीत अडकलेल्या 57 कामगारांच्या सुटकेचा थरारक अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.