ETV Bharat / entertainment

Anupam Kher suffered serious injury : अनुपम खेर यांना गंभीर दुखापत, शाहरुख खान आणि हृतिक रोशनलाही केले टॅग - शाहरुख खान

अनुपम खेर यांना त्यांच्या आगामी 'विजय 69' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खांद्याला दुखापत झाली. त्यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

Anupam Kher  suffered serious injury
शाहरुख खान आणि हृतिक रोशनलाही केले टॅग
author img

By

Published : May 22, 2023, 7:57 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांना त्यांच्या आगामी 'विजय 69' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली आहे. अनुपम यांनी सोमवारी सांगितले की, शुटिंग करत असताना त्यांना हेअरलाइन फ्रॅक्चर झाली आहे. या दुर्घटनेबद्दल तपशील शेअर करताना खेर यांनी सुपरस्टार शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांच्या नावाचाही उल्लेख आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.

'अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स फिल्म करता आणि तुम्हाला दुखापत होत नाही! हे कसे शक्य आहे? काल विजय ६९ च्या शूटिंग दरम्यान, खांद्याला गंभीर दुखापत झाली', असे अनुपम यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये हृतिक आणि शाहरुख खान यांना देखील टॅग केले कारण त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देखील सुपरस्टार्सना भूतकाळातील दुखापतींमधून बरे होण्यास मदत केली होती. झालेली दुखापत खूप वेदनादायक असल्याचे वर्णनही पोस्टमध्ये खेर यांनी केलंय.

काही दिवसांनंतर शूटिंग पुन्हा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. यशराज फिल्म्स एंटरटेनमेंटचा आगामी विजय ६९ हा OTT चित्रपट अक्षय रॉय दिग्दर्शित करणार आहे. यात वयाच्या ६९ व्या वर्षी ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेणार्‍या एका पुरुषाच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल. बँड बाजा बारात, शुद्ध देसी रोमान्स यांसारख्या यशराज फिल्मसाठी निर्मिती करणारे निर्माते मनीश शर्मा विजय ६९ ची निर्मिती करणारे आहेत.

अनुपम खेर यांचा स्पोर्ट्स-थीमवर आधारित हा पहिला चित्रपट नाही. याच विषयावरचा शिव शास्त्री बाल्बोआ हा चित्रपट नुकताच अनुपमने प्रदर्शित केला होता. यामधील नायक हा तो तंदुरुस्तीची उद्दिष्टे पूर्ण करत राहतो आणि सर्व वयोगटातील लोकांना काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रेरित करतो. त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त, अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांच्या फोबियावर मात करण्यासाठी त्यांनी पोहणे शिकण्यास सुरुवात केली. नवीन काहीही सुरू करण्यास कधीही उशीर झालेला नाही. खेर यांनी अलीकडे उंचाई आणि शिवशास्त्री बालबोआ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि या दोन्ही चित्रपटांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली होती.

हेही वाचा - Actor Aditya Singh Rajput Dead : अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा संशयास्पद मृत्यू; अति ड्रग सेवन केल्याचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.