मुंबई - अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांची Anupam Kher and Neena Gupta मुख्य भूमिका असलेल्या शिव शास्त्री बलबोआ Shiva Shastri Balboa या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसाठी शेअर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजयन वेणूगोपालन Directed by Ajayan Venugopalan यांनी केले असून किशोर वारियत Kishore Variyat यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
पोस्टरमध्ये अमेरिकेतील एका ग्रामीण परिसरातील कुरण दिसत असून त्यावर बकऱ्या चरताना दिसत आहेत. याच कुरणातून एक डांबरी रस्ता जात असून रस्त्याच्या कडेला अनुपम आणि नीना गुप्ता वाहनांची प्रतीक्षा Anupam and Neena Gupta wait for vehicles करत आहेत. त्यांच्याकडे मोठी बॅग दिसत असून ते आपल्या पेटसह प्रवासाला निघालेले दिसतात. अनुपम यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत असून नीना गुप्ता मात्र बिनधास्त दिसत आहेत.
शिव शास्त्री बलबोआ हा चित्रपट वेगळ्या विषयावरचा आहे हे फर्स्ट लूकवरुन दिसत आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग अमेरिकेत पार पडले आहे. त्यामुळे अमेरिकेतील न पाहिलेली लोकेशन्सचे दर्शन या चित्रपटातून प्रेक्षकांना होणार आहे.
या चित्रपटाबद्दलचा अधिक तपशील निर्मात्यांकडून गुलदस्त्यात ठेवला आहे. शिव शास्त्री बलबोआ या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, जुगल हंसराज, नर्गिस फाखरी आणि शरीब हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असतील. या चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप ठरलेली नाही.
हेही वाचा - Sherlyn Chopra Video : जिममध्ये जात नसाल तर शर्लिन चोप्राचा हा व्हिडिओ जरुर पाहा