ETV Bharat / entertainment

Bigg boss 17 : अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा बिग बॉसच्या घरातील रोमँटिक व्हिडिओ व्हायरल - रोमँटिक व्हिडिओ

Bigg boss 17 : अंकिता लोखंडे आणि विकी जैन या जोडप्यामध्ये 'बिग बॉस'च्या घरात चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या कपलचा एक रोमँटिक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवताना दिसत आहेत.

Bigg boss 17
बिग बॉस 17
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 12:02 PM IST

Updated : Nov 1, 2023, 3:02 PM IST

मुंबई - bigg boss 17 : अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे कपल आता 'बिग बॉस'च्या घराचा भाग झालंय. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये हे कपल रोमँटिक क्षण घालवताना दिसतंय. हे जोडपं जेव्हा 'बिग बॉस'मध्ये आलं होतं तेव्हा, चाहत्यांना वाटू लागलं की शोमध्ये त्यांची रोमँटिक बाजू पाहायला मिळेल. मात्र त्यांच्यात सतत भांडणं होत होती. अनेकदा विकी अंकितावर रागावलेला दिसत होता, त्यानंतर ती कुठल्यातरी कोपऱ्यात रडताना दिसत होती. अंकिता आणि विकीच्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत, पण तरीही दोघंही एकत्र राहत नाहीत. अंकितानं यामागचं कारण सांगितलं आहे.

अंकिता लोखंडेने केला खुलासा : 'बिग बॉस'च्या घरात जाण्यापूर्वी एका मुलाखतीत अंकिता लोखंडेनं ती 'बिग बॉस'च्या घरात का जात आहे, याचा खुलासा केला होता. तिनं सांगितलं होतं की, जर मी विकीबरोबर जात असेन तर, तो माझा आधार आणि ताकद असेल. त्यानंतर तिनं पुढं सांगितलं की, विकी आणि मी एकत्र राहत नाही. हा प्रवास मी ४ महिन्यांचा मानत आहे. ही आमच्यासाठी एकत्र आनंद घेण्याची संधी आहे. आम्ही एकत्र राहत नाही. मी मुंबईत राहते, विकी त्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने बिलासपूरला राहतो. तो दोन्ही शहरांत फिरत राहतो. आमच्या हनिमूनच्या वेळी 20 दिवसांपेक्षा जास्त काळ एकत्र राहण्याची संधी आम्हाला मिळाली नाही. म्हणूनच मला एकत्र राहण्याची ही चांगली संधी वाटली.

सलमान खाननं विकीला फटकारलं : चाहत्यांना अंकिता आणि विकीमधील होत असलेली भांडणं आवडत नाही. सलमान खाननं अंकिताशी बोलण्याच्या पद्धतीमुळे विकीला फटकारलं होतं. 'बिग बॉस'मध्ये हे स्टार कपल पॉवर कपल असल्याचं बोललं जात आहे. अंकिताचा चाहतावर्ग खूप मोठा आहे, त्यामुळे ती 'बिग बॉस 17' जिंकेल अशी अपेक्षा केली जात आहे. अंकिता आणि विकीमध्ये आता चांगली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. अंकिता लोखंडेनं 2019मध्ये व्यावसायिक विकी जैनसोबत तिचे नाते जाहीर केले. त्यानंतर तिनं 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबईत त्याच्याशी लग्न केले. त्याच्या लग्नात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

हेही वाचा :

  1. Varun Lavanya Photos : साऊथ स्टार वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी आज अडकणार लग्नबेडीत
  2. Sonnalli Seygall Pics : सोनाली सहगलनं शेअर केले इंस्टाग्रामवर हॉट फोटो ; पाहा पोस्ट....
  3. Zimma 2 teaser released : ‘झिम्मा २’च्या गर्ल गँगमध्ये सामील होणार 'सैराट'ची आर्ची, ‘झिम्मा २’ चा टीझर रिलीज

Last Updated : Nov 1, 2023, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.