मुंबई - Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' हा शो प्रेक्षकांचं अधिकाधिक मनोरंजन करत आहे. या शोमध्ये नेहमीच जेवणावरून भांडणं होत असतात. मागच्या भागातही असंच काहीसं घडलं होतं. 'बिग बॉस'चा नियम असा आहे की प्रत्येक सदस्य फक्त त्याच्या घरात तयार केलेला पदार्थ खाईल. मात्र जेव्हा घरातील सदस्यांना समजलं की ईशानं (दिल हाऊस) विकीच्या ताटातून जेवण खाल्लं आहे, तेव्हा घरात गोंधळ उडाला. सगळ्यांना ईशाचा राग आला. त्यानंतर ईशानं सांगितले की, तिच्यासोबत खानजादी (दिमाख हाऊस) यांनीही विकीच्या (दिल हाऊस) ताटातील जेवण खाल्लं होतं.
-
Promo #BiggBoss17 Ghar walu ke gandgi karne pe mili saza pic.twitter.com/qere48945p
— The Khabri (@TheKhabriTweets) November 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Promo #BiggBoss17 Ghar walu ke gandgi karne pe mili saza pic.twitter.com/qere48945p
— The Khabri (@TheKhabriTweets) November 21, 2023Promo #BiggBoss17 Ghar walu ke gandgi karne pe mili saza pic.twitter.com/qere48945p
— The Khabri (@TheKhabriTweets) November 21, 2023
अंकितानं उघड केलं विकी- खानजादीचं रहस्य : विकी आणि खानजादी या दोघांनीही याप्रकरणी नकार दिला. त्यानंतर अंकिता लोखंडेनं सांगितलं की, दिमाख हाऊसमध्ये राहणाऱ्या सदस्यांनी बनवलेले अन्नही खानजादीनं खाल्लं, तेव्हा घरातील सदस्यांना राग आला. अंकिताचं हे बोलणं ऐकून विकीनं खुशीत तिची मान पकडली. अंकितानं त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला असता त्यानं मागून तिचा हात धरला. त्यानंतर अंकिता विकीला मारण्यासाठी त्याच्या मागे धावली. अंकिताला विकीला पकडता न आल्यानं तिनं तिची दोन्ही पायातील चपला काढून विकीला मारहाण करण्यास सुरुवात केली. अंकिताच्या या कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले. घरातील सर्व सदस्य अंकिताला प्रोत्साहन देऊ लागले. यानंतर अंकिता तेथून निघून गेली.
'बिग बॉस'मध्ये सर्व स्पर्धक सापडले अडचणीत: 'बिग बॉस 17'मध्ये लवकरच 'बिग बॉस' घरातील सदस्यांवर नाराज होताना दिसणार आहे. 'बिग बॉस' आणि निर्माते सीझनच्या सुरुवातीला, घराचा फेरफटका मारतात. सुरुवातीचे काही दिवस 'बिग बॉस'चं घर खूपच सुंदर दिसत होतं. पण नंतर घरातील सदस्य म्हणजेच 'बिग बॉस'च्या स्पर्धकांनी या घरात अस्वच्छता पसरवली. 'बिग बॉस 17' शोमधील 'किचन' हे खूप घाणरडं असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. सुंदर दिसण्यासाठी मेक-अप करण्यात स्पर्धक खूप व्यग्र असतात. त्यामुळं 'बिग बॉस'च्या घरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करताना दिसतात. 'बिग बॉस'च्या किचनमध्ये उष्टी भांडी, तुंबलेलं पाणी, खराब झालेलं अन्न, भाजीपाल्याच्या साली नेहमी पडलेल्या दिसतात. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' स्पर्धकांना अस्वच्छतेवरून रागावताना दिसतात. शिक्षा म्हणून 'बिग बॉस' घरातील सदस्यांचे रेशन आणि सामान ताब्यात घेणार आहे. आता 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांना त्यांचे सामान मिळेल का? सर्व स्पर्धक 'बिग बॉस' तसंच शोच्या निर्मात्यांची माफी मागतील का? हे पाहणे वेधक ठरणार आहे.
हेही वाचा :