ETV Bharat / entertainment

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'चं रानटी कलेक्शन, 4 दिवसांत 400 कोटींचा टप्पा पार - संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमल

Animal worldwide box office collection: रणबीर कपूर स्टारर अ‍ॅनिमलने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत जागतिक बॉक्स ऑफिसवर 425 कोटी रुपयांची कमाई केली आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटात बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Animal worldwide box office collection
रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमलचं रानटी कलेक्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 5:17 PM IST

मुंबई - Animal worldwide box office collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा जागतिक बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत चित्रपटानं जगभरातील कमाईमध्ये ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं केवळ चार दिवसांत एकूण 425 कोटी रुपये जमवून जागतिक बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे.

टी-सीरीज म्युझिक कंपनीनं इंस्टाग्रामवर बॉक्स ऑफिस कमाईची अपडेट दिली आहे. त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ''अ‍ॅनिमलने सोमवारी जिंकले." पुढे त्यांनी हा चित्रपट ब्लॉकबस्टर यश मिळवत असल्याचंही त्यांनी लिहिलंय. फिल्म विषयक ट्रेड विश्लेषकाच्या मते 'अ‍ॅनिमल' चित्रपटानं रिलीजच्या दिवशी 116 कोटी रुपये कमावले. त्यानंतर पहिल्या शनिवारी 120 कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली आणि पहिल्या रविवारी 120 कोटी रुपये करत आकडा स्थिर ठेवला. जागतिक बॉक्स ऑफिसवर सोमवारी 69 कोटी रुपये कमावले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'अ‍ॅनिमल' चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. त्याच्या रिलीजच्या दिवशी, इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकड्यांनुसार अ‍ॅनिमलने 63.8 कोटी, त्यानंतर शनिवारी 66.27 कोटी, रविवारी 71.46 कोटी आणि सोमवारी अंदाजे 43.96 कोटी कमावले. सोमवारपर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन तब्बल 245.59 कोटी रुपये झाले आहे.

समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्यानंतरही अ‍ॅनिमल प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट अंडरवर्ल्डच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या पिता-पुत्राच्या तणावपूर्ण नातेसंबंधावर भाष्य करतो. त्याचे आणि वडीलांबद्दलचे नाते वरकरणी विसंगत वाटत असले तरी वडिलांना त्रास देणाऱ्यांसाठी तो कर्दनकाळ बनतो. त्याच्यातील एक प्रकारचे श्वापद जागे होते.

रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका 'अ‍ॅनिमल'ने 7.4/10 चे IMDb रेटिंग मिळवलं आहे. 1 डिसेंबर रोजी विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'सोबत 'अ‍ॅनिमल' चित्रपट जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

हेही वाचा -

1. दीपिका पदुकोणचं 'फायटर' चित्रपटामधील फर्स्ट लूक पोस्टर रिलीज

2. 'तारक मेहता'वर बहिष्कार टाकल्याच्या अफवांवर निर्माते असित मोदीनं केला खुलासा

3. 'डंकी'चा ट्रेलर पाहून नेटिझन्सचे नाना तर्क वितर्क, कल्पनाविलासाची गगन भरारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.