ETV Bharat / entertainment

अनन्या पांडेनं शेअर केला तिचा बालपणीचा व्हिडिओ, चाहत्यांनी केल्या कमेंट्स - childhood video

Ananya Panday childhood video: स्टार किड्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक लहान मुलगी इंग्रजीमध्ये कविता वाचताना दिसत आहे. ही स्टार किड अनन्या पांडे आहे.

Ananya Panday childhood video
अनन्या पांडेचा बालपणीचा व्हिडिओ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 1:35 PM IST

मुंबई - Ananya Panday childhood video : अभिनेत्री अनन्या पांडे बी-टाऊनमधील सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. अनन्यानं सोमवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये अनन्या माकडाची कविता वाचताना दिसत आहे. पिंक कलरच्या ड्रेसमध्ये अनन्या खूपच क्यूट दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी भाऊ अहान पांडे तिला ढकलतो. अनन्या रडण्याऐवजी हसते. आईनं विचारल्यावर ती सांगते की अहाननं तिला ढकललं. अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

अनन्या पांडेनं शेअर केला व्हिडिओ : बालपणीची ही क्लिप शेअर करत अनन्यानं बेडूक इमोजीसह कॅप्शनमध्ये लिहिलं, ''पहिल्या दिवसापासून एन्थू कटलेट.' व्हिडिओमध्ये छोटी अनन्या इंग्रजीत कविता खूप मजेत वाचत आहे. आता या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. करिश्मा कपूरनं या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं लिहिलं की, ''ती त्या क्षणी खूप निरागस होती. आता ती बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे''. दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''अनन्या तु खूप सुंदर दिसत आहेस, तुझा हा व्हिडिओ खूप अप्रतिम आहे''. आणखी एका चाहत्यानं लिहिल, ''अहान पांडे तू तिला धक्का का मारला''. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

वर्क फ्रंट : चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेनं 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्यानंतर ती'लायगर' चित्रपटामध्ये दिसली, तिचा हा चित्रपट देखील फ्लॉप झाला. तिचे बॉलिवूडमधील 'ड्रीम गर्ल 2' , 'पती पत्नी और वो' हे चित्रपट हिट ठरले. याशिवाय अनन्यानं ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिची जादू पसरवली आहे. तिनं ओटीटी चित्रपट 'गहराइयां' आणि 'खाली पीली'मध्ये काम केलं आहे. अनन्या पांडेचा आगामी चित्रपट 'खो गये हम कहाँ' 26 डिसेंबर 2023 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसेल. आजकाल ती 'आशिकी 2' अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्यामुळं चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. 'डंकी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खाननं गाठलं दुबई ; चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ
  2. आलिया भट्टनं रविवारच्या 'आस्क मी एनिथिंग'मध्ये मुलगी राहाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्नांचा केला खुलासा
  3. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीनं ख्रिसमस सेलिब्रेशनची केली झलक शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.