ETV Bharat / entertainment

Amrita Khanwilkar expressed regret : माझ्या पप्पांनी आजपर्यंत माझा डान्स बघीतला नाही, अमृता खानविलकरने व्यक्त केली खंत! - हिमांशु मल्होत्रा

प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा ही सुंदर जोडी आली होती. यावेळी नृत्यात पारंगत असलेल्या अमृताने सांगितले की तिच्या वडीलांनी तिचा डान्स अद्याप पाहिलेला नाही, ही खंत तिने बोलून दाखवली.

Amrita Khanwilkar
Amrita Khanwilkar
author img

By

Published : Feb 9, 2023, 4:16 PM IST

मुंबई - प्लॅनेट मराठीवरील पटलं तर घ्या विथ जयंती हा टॉक शो सध्या बराच चर्चेत आहे. सेलेब्रिटींशी गप्पा मारणारे अनेक शो हिंदी वाहिन्यांवर चालतात, परंतु मराठी माध्यमात असे शो फार झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर हा शो छान मनोरंजन करत आहे. या शोमध्ये सेलेब्रिटीजच्या अनेक अनोख्या गोष्टी उलगडल्या जातात, रहस्यांवरील पडदा बाजूला सरकतो आणि प्रेक्षकांना एक नवीन रंजक माहिती यामुळे मिळते. या शोचा नवा प्रोमो सध्या सोशळ मीडियावर गाजतो आहे.

असं म्हटलं जातं की वडील आणि मुलींमध्ये प्रेमाचा झरा खळाळत वहात असतो. मुलींच्या अचिव्हमेंट्स पाहून बाप जास्त खूष होत असतो. परंतु महाराष्ट्राची 'चंद्रमुखी' अमृता खानविलकर ला मात्र एक खंत सतावतेय. अमृता उत्तम अभिनेत्री तर आहेच परंतु ती एक उत्कृष्ट नृत्यांगनासुद्धा आहे. तिने अनेक कार्यक्रमांतून नृत्य सादर केले आहे. परंतु तिच्या वडिलांनी आजपर्यंत अमृता ला लाईव्ह नृत्य करताना पाहिले नाहीये. "माझ्या पप्पांनी मला आजपर्यंत डान्स करताना बघितले नाहीये", असेअमृता खानविलकरने सांगितले.

'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा

सध्या सिनेसृष्टीत लग्नसोहळ्यांचा हंगाम आहे. एकीकडे जोड्या जुळत असतानाच अभिनेत्री अमृता खानविलकरने मात्र तिच्या चाहत्यांना एक धक्का दिला आहे. अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे क्युट कपल म्हणून पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वीच अमृताने हिमांशु आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जोरदार वाढदिवस साजरा केला होता. मात्र आता अमृताने हिमांशुला सोशल मीडियावर ब्लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबद्दलचा खुलासा अमृताने प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॅाक शोमध्ये केला आहे.

अमृताने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. मात्र यावेळी हिमांशुने अमृताला अनफॉलो केले आहे, त्यांच्यात नेमकं काय घडलं, ते असं का करतात, याचे उत्तर प्रेक्षकांना शुक्रवारी म्हणजेच १० फेब्रुवारी मिळेल. माझ्या पप्पांनी मला आतापर्यंत डान्स करताना बघितले नसल्याचाही खंतही यावेळी अमृताने व्यक्त केली.

'पटलं तर घ्या विथ जयंती'मध्ये अमृताने अनेक गोष्टी गंमतीदार किस्से, खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. या गप्पाटप्पांमध्ये दिग्दर्शक ओम राऊतही सहभागी झाला असून अमृता आणि तो ‘बर्गर बडीज’ असल्याचे गुपित त्याने यावेळी सांगितले. या नव्या शोचे उत्सुकता या चर्चेमुळे प्रेकांच्या मनात वाढीस लागल्यास आश्चर्य नाही.

हेही वाचा - song Ek Phul from film TDM : 'टीडीएम' मधील 'एक फूल वाहतो सखे' गाणं झालं व्हायरल, प्रेमीयुगुलांच्या दिलाचा चुकतोय ठोका!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.