मुंबई - मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने गुरुवारी आपल्या ब्लू टिक व्हेरिफिकेशन पॉलिसीमध्ये बदल केला. नवीन धोरणामुळे अनेक नामांकित खात्यांमधून ब्लू टिक्स काढून टाकण्यात आले. शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक बी-टाउन सेलिब्रिटींनी सेवेसाठी पैसे न दिल्याने त्यांच्या ट्विटर खात्यांवरील त्यांच्या अधिकृत ब्लू टिक्स गमावल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांची मिश्कील प्रतिक्रिया - ब्लू टिक्स गमावल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक हिंदी पोस्ट शेअर केली. अमिताभ यांनी मिश्किल भाषेत ट्विटरवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी लिहिलंय, 'ओ ट्विटरवाल्या भाऊ, ऐकतोयस ना? आता तर मी पैसे पण भरलेत...ते आमच्या नावाचे पुढे जे नीलकमल असतं ना, ते परत लावा ना भाऊ, त्यामुळे लोकांना कळेल की मीच अमिताभ बच्चन आहे. हात तर जोडलाय आम्ही, आता काय पाय पण जोडायचे आहेत का??'
-
T 4623 - ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम ... तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं - Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा 👣जोड़े पड़ी का ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 4623 - ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम ... तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं - Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा 👣जोड़े पड़ी का ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023T 4623 - ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम ... तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं - Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा 👣जोड़े पड़ी का ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023
युजर्सच्या प्रतिक्रिया - हे ट्विट मायक्रोब्लॉगिंग साइटवर व्हायरल झाले आणि युजर्सनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहे. एका यूजरने लिहिले की, 'ब्लू टिक हे संयमाचे फळ आहे.' दुसर्या व्यक्तीने लिहिले, '3,4, दिवस प्रतीक्षा करा.' 'एलोन मस्क हा परदेशी आहे जो कधीही कोणाकडे लक्ष देत नाही, मिस्टर बच्चन. तुम्हाला काही दिवस थांबावे लागेल', असे तिसऱ्या युजरने सांगितले.
एलोन मस्कचे ट्विटरबद्दल नवे धोरण - निळ्या टिकचा वापर सुरुवातीला प्रसिद्ध लोकांना तोतयागिरीपासून संरक्षण करण्यासाठी आणि खोट्या माहितीचा सामना करण्यासाठी केला जात असे. ट्विटरवर कोणती सार्वजनिक हिताची खाती कायदेशीर आहेत आणि कोणती बनावट खाती आहेत हे वापरकर्त्यांना सांगणे सोपे करण्यासाठी, ट्विटरने 2009 मध्ये प्रथम ब्लू टिक मार्क प्रणाली सुरू केली. यापूर्वी, ट्विटर सत्यापनासाठी शुल्क आकारत नव्हते. गेल्या वर्षी कंपनीच्या अधिग्रहणानंतर दोन आठवड्यांच्या आत, मस्कने ट्विटर ब्लू सादर केला, ज्यामध्ये डीलक्स फायद्यांपैकी एक म्हणून चेक-मार्क बॅजचा समावेश करण्यात आला होता.
हेही वाचा - Poster Boys 2 : 'पोस्टर बॉईज'च्या सिक्वेलसाठी श्रेयस तळपदेने घेतले सिद्धिविनायकाचे आशीर्वाद...