मुंबई : Amitabh Bachchan Tweets : केंद्र सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यात इंडियाचं नामकरण भारत असं करण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. यातच इंडिया विरुद्ध भारत या वादात अमिताभ बच्चननं उडी घेतलीय. सध्या अमिताभ बच्चनचं 'X' वरचं मत सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. बच्चन यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट करण्यात आलीय. या पोस्टमध्ये बच्चन यांनी 'भारत माता की जय' असं लिहिलं आहे. त्यामुळं बच्चन यांच्या एक्स हँडलवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण बिग बीचं समर्थन देखील करताना दिसत आहेत. (India Vs Bharat Controversy)
-
T 4759 - 🇮🇳 भारत माता की जय 🚩
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 4759 - 🇮🇳 भारत माता की जय 🚩
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 5, 2023T 4759 - 🇮🇳 भारत माता की जय 🚩
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 5, 2023
काँग्रेसने केले आरोप : G-20 शिखर परिषदेनिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणाऱ्या निमंत्रण पत्रावरून हा वाद निर्माण झालाय. ज्यावर आता काँग्रेसनं आरोप केले आहेत. या प्रकरणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलंय. राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी G-20 शिखर परिषदेच्या सदस्यांसाठी रात्रीचं भोजन आयोजित करण्यात आलंय. त्यासाठी राष्ट्रपती भवनानं निमंत्रण पत्रिकेवर 'इंडिया'ऐवजी' 'भारत नाव लिहिल्यामुळं सध्या देशात राजकारण तापलंय. यावरून जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत 'इतिहासाचं विकृतीकरण तसंच भारताचं विभाजन करण्याचा' आरोप केला आहे.
इंडियाचं विभाजन करण्याचा सरकारचा डाव : या संदर्भात जयराम रमेश यांनी 'एक्स' साईटवर पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, 'मिस्टर मोदी इतिहासाचं विकृतीकरण करून इंडियाचं विभाजन करण्याची शक्यता आहे. भारत हे राज्यांचे संघराज्य आहे. भारतीय जनता पक्षांचं नेमकं उद्दिष्ट काय आहे? हा भारत आहे, इथं सौहार्द, सलोखा, विश्वासाचं वातावरण आहे. इंडिया आघाडीबाबत बोलायचं झाल्यास आमच्या आघाडीचं नाव इंडिया आहे. तसंच आमची टॅगलाईन जुडेगा इंडिया जितेगा भारत असं लिहिलंय. त्यामुळं इंडिया आघाडीला मोदी सरकार घाबरलं आहे, असा आरोप त्यांनी केलाय.
'इंडिया'ऐवजी 'भारत' : भाजपा राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी मीडियासोबत बोलताना म्हटलं की, संपूर्ण देशात 'इंडिया' ऐवजी 'भारत' शब्द वापरण्याची त्यांनी मागणी केलीय. 'इंडिया' हा शब्द ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली शिवी आहे. तर 'भारत' हा शब्द आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यामुळं आपल्या संविधानात बदल करण्याची गरज असल्यास तो केला जावा, त्यात 'इंडिया'ऐवजी भारत लिहिण्याची मागणी देखील त्यांनी केली.
हेही वाचा :