मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन छोट्या ब्रेकनंतर कामावर परतले आहेत. दुखापतीतून सावरत असतानाही त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केल्याचे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगद्वारे सांगितले. प्रभासच्या आगामी चित्रपट प्रोजेक्ट केच्या शूटिंग दरम्यान बिग बी यांच्या बरगडीला दुखापत झाली होती. त्यावेळी बच्चन यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक पोस्ट लहून आपल्या हरगडीला दुखापत झाल्याचे व स्नायू तुटल्याचे कळवले होते.
डॉक्टरांनी दिला होता विश्रांतीचा सल्ला - हैदराबादमधील डॉक्टरांनी बच्चन यांना त्यांच्या कामातून विश्रांती घेण्याचा आणि सीटी स्कॅननंतर घरी आराम करण्याचा सल्ला दिला. आजारपणामुळे, बॉलीवूड स्टारने रविवारी चाहत्यांशी नेहमीची भेट दिली आणि शुभेच्छा देखील दिल्या होत्या. बुधवारच्या पहाटे त्यांनी ब्लॉगवर बिग बींनी चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आणि सांगितले की ते कामावर परतले आहेत. पुन्हा एकदा शुटिंगला सुुरुवात केल्याचे सांगत त्यांनी चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी मेकअप केल्याचे व शॉट दिल्याचेही कळवले आहे.
८० वर्षाच्या बच्चन यांनी दुखापतीवर केली मात - मार्चमध्ये हैदराबादमध्ये 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगदरम्यान अमिताभ यांना दुखापत झाली होती. त्यानंतर चित्रपटाच्या टीमने शुटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला होता. इतके दिवस बच्चन यांनी घरीच उपचार घेतले. खूप वेदना सहन करत त्यांनी हा आपला काळ घालवला. या दरम्यान त्यांना श्वास घेतानाही त्रास होत होता. अखेर या सर्वांतून ते सुखरुप बरे झाले व त्यांनी पुन्हा कामाला सुरूवात केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अमिताभ यांनी वयाची ८० गाठली आहे. त्यामुळे जखम भररुन येणे व पुर्ववत चालता फिरता येणे हे त्यांच्यासाठी एक आव्हानात्मक होते. मात्र अत्यंत शिस्तबद्धपणे त्यांनी या दुखापतीवर मात केली आहे.
अमिताभ यांचे आगामी चित्रपट - नाग अश्विन दिग्दर्शित, 'प्रोजेक्ट के' हा द्विभाषिक चित्रपट आहे जो एकाच वेळी दोन भाषांमध्ये म्हणजेच हिंदी आणि तेलुगूमध्ये विविध ठिकाणी शूट केला जात आहे. दीपिका पदुकोण आणि प्रभास या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. त्याशिवाय, अमिताभ बच्चन हे रिभू दासगुप्ताच्या पुढील कोर्टरूम ड्रामा चित्रपट 'सेक्शन 84' मध्ये देखील दिसणार आहेत.
हेही वाचा - Kiccha Sudeep To Join Bjp : 'मक्की' फेम किच्चा सुदीप भाजपमध्ये सामील होणार?