ETV Bharat / entertainment

Amitabh Bachchan Injured : 'प्रोजेक्ट के'च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, चाहत्यांसाठी बिग बींनी दिली अपडेट

अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अमिताभ यांनी त्याच्या ब्लॉगवर त्याचे आरोग्य अपडेट शेअर केले आणि सांगितले की तो सध्या त्याच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे

अमिताभ बच्चन जखमी
अमिताभ बच्चन जखमी
author img

By

Published : Mar 6, 2023, 10:18 AM IST

Updated : Mar 6, 2023, 10:37 AM IST

हैदराबाद - बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन हैदराबादमध्ये त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. अमिताभ यांनी त्याच्या ब्लॉगवर त्याचे आरोग्य अपडेट शेअर केले आणि सांगितले की ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहेत.

बच्चन यांनी लिहिलंय की, 'हैदराबादमध्ये प्रोजेक्ट केच्या शूटिंगच्या दरम्यान अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग असताना मी जखमी झालो. बरगडी तुटली आणि छातीच्या पिंजऱ्याचे स्नायूना दुखापत झाली. त्यामुळे शुटिंग रद्द करावे लागले. डॉक्टरांनी हैद्राबादमधील एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटीद्वारे तपासणी केली आणि स्कॅन केले आणि घरी परतलो आहे. स्ट्रॅपिंग केले असून विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे.. खूपच वेदनादायक आहे.. हालचाल आणि श्वासोच्छवासाठी त्रास रहोतोय.. सर्व काही सामान्य होण्यासाठी काही आठवडे लागतील. वेदनांवर काही औषधे देखील सुरू आहेत.. ', असे अमिताभ यांनी रविवारी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले आहे.

हा अपघात झाल्यानंतर प्रोजेक्ट के चित्रपटाचे शुटिंग थांबवण्यात आले आहे. अमिताभ बरे होईपर्यंत त्यांचे शुटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. अमिताभ सध्या त्यांच्या मुबंईतील जलसा बंगल्यात विश्रांती घेत आहेत. साधारणपणे रविवारी त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहते मोठ्या संख्येने हजर राहतात. त्यांनाही अमिताभ यांनी ब्लॉगच्या माध्यमातून निरोप दिला की ते त्यांच्या भेटीसाठी येऊ शकणार नाहीत.

'प्रोजेक्ट के' हा चित्रपट नाग अश्विनने दिग्दर्शित करत असून यामध्ये अमिताभसह सुपरस्टार प्रभासदेखील मुख्य भूमिकेत आहे. यात दीपिका पदुकोणचीही महत्त्वाची भूमिका आहे. यापूर्वी पिकू चित्रपटात दीपिका आणि अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी एकत्र काम केले होते, तर हा प्रभासचा दीपिका आणि बच्चनसोबतचा पहिलाच चित्रपट आहे.

'प्रोजेक्ट के', हा चित्रपट एकाच वेळी तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये शूट केले गेले आहे. या चित्रपटाच्या दरम्यान दीपिकाही आजारी पडली होती व हैदराबादमधील कामिनेनी रुग्णालयात तिच्यावर उपचार झाले होते. या चित्रपटातून दीपिका तेलुगू चित्रपटात पदार्पण करत आहे. प्रोजेक्ट के हा दीपिका आणि प्रभाससोबतचा पहिलाच एकत्रीत चित्रपट आहे.

हेही वाचा - Ar Ameen Son Accident : झुंबरसह संपूर्ण ट्रस कोसळला, एआर रहमानचा मुलगा एआर अमीन थोडक्यात बचावला

Last Updated : Mar 6, 2023, 10:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.