मुंबई Amitabh Bachchan 81st Birthday : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना शतकातील मेगास्टार म्हटलं जातं. त्यांनी आपल्या अभिनयानं कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलंय. अमिताभच्या कारकिर्दीतील सुरुवातीचे चित्रपट पाहायला आजही लोकांना आवडतात, ज्याद्वारे अमिताभ यांना देशभरात ओळख मिळाली. विशेषत: त्या चित्रपटांचे डायलॉग आजही लोकांच्या मनात घर करून आहेत.
अमिताभ यांनी 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. 1973 मध्ये प्रदर्शित झालेला 'जंजीर' हा त्यांना अॅक्शन स्टार बनवणारा चित्रपट होता. त्यानंतर 'दीवार' (1975) चित्रपटामुळं त्यांना 'अँग्री यंग मॅन'चा टॅग मिळाला. त्यांच्या आवाजानेच अमिताभ यांना प्रत्येक घराघरात प्रसिद्ध केले, जो आजही लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचं काही प्रसिद्ध डायलॉग कोणते आहेत, ज्यांनी अमिताभ यांना शतकातील मेगास्टार बनवलं, पाहूया...
1.'आज खुश तो बहुत होंगे तुम...'
'दीवार' चित्रपटातील हा डायलॉग आजही लोकांच्या मनात घर करून आहे. या काळातील अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ यांचा हा डायलॉग पुन्हा तयार करण्यात आला आहे.
2.डॉन का इंतजार तो ग्यारह मुल्कों की पुलिस कर रही है
1978 मध्ये आलेल्या 'डॉन' चित्रपटातील हा डायलॉग चांगलाच चर्चेत राहिला होता.
3. कभी-कभी मेरे दिल में ख्याल आता है
हा रोमँटिक डायलॉग अमिताभ यांच्या १९७६ मध्ये आलेल्या 'कभी-कभी' चित्रपटातील आहे. ज्यात त्यांची सहकलाकार रेखा होती.
4.हम जहां खड़े होते हैं लाइन वहीं से शुरु होती है
बिग बींनी बोललेला हा डायलॉग आजही अनेक चित्रपटांमध्ये रिक्रिएट केला जातो. हा डायलॉग आजही सर्वसामान्यांच्या ओठावर आहे.
5. विजय दीनानाथ चौहान पूरा नाम
1990 मध्ये 'अग्निपथ' चित्रपटात बोललेला हा डायलॉग त्या काळात खूप चर्चेत होता.
6. परंपरा, प्रतिष्ठा अनुशासन
'मोहब्बतें' चित्रपटात बोललेल्या या डायलॉगनं अमिताभ यांची प्रतिमा उंचावर नेली होती.
7. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है शहंशाह
1988 मध्ये शहेनशाहमध्ये अमिताभ यांनी बोललेला हा डायलॉग आजही त्यांची ओळख आहे. या दमदार डायलॉगमुळं अमिताभ प्रसिद्ध झाले.
8. देवियों और सज्जनों
अमिताभ यांनी होस्ट केलेल्या कौन बनेगा करोडपती या शोने 'देवियों और सज्जनों' प्रसिद्ध झाला, हा डायलॉग आज अमिताभची ओळख बनलाय.
हेही वाचा :
- Wedding Anniversary : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण, श्वेता बच्चनने दिल्या खास शुभेच्छा
- Amitabh Bachchan Tweet On Blue Tick : ए ट्विटर खेल खतम, पैसे हजम.. बिग बींनी पुन्हा घेतली ट्विटरची फिरकी
- Amitabh Bachchan Surprises Fans : रिवाज मोडत अमिताभ यांनी जलसाबाहेर जमलेल्या चाहत्यांना दिली सरप्राईज भेट