मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा येत्या ११ ऑक्टोबर रोजी ८० वाढदिवस साजरा होणार आहे. त्यांचे लाखो फॅन्स यादिवशी त्यांना अभिवादन करता, त्यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करतात. बिग बी यांचे फिल्म इंडस्ट्रीतील लोकही हा दिवस अत्यंय अभिमानाने साजरा करतात. यावेळी फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने अमिताभ यांच्या ८० वा जन्मदिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. येत्या ८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत अमिताभ यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरवला जाणार आहे. त्यांचे जुने क्लासिक चित्रपट पाहण्याची संधी यावेळी चाहत्यांना मिळणार आहे.
अमिताभ यांच्या जन्मदिनानिमित्य आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रपटाचे शीर्षक - 'बच्चन बॅक टू द बिगिनिंग' असे असेल. देशभरातील १७ महत्त्वाच्या शहरात या महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
-
AMITABH BACHCHAN FILM FESTIVAL TO MARK 80TH BIRTHDAY... To mark the 80th birthday of actor #AmitabhBachchan, #FilmHeritageFoundation will organise a 4-day film festival - ‘Bachchan Back To The Beginning’ - in partnership with #PVRCinemas... From 8 - 11 Oct 2022 in 17 cities. pic.twitter.com/PkAYlxgC2i
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">AMITABH BACHCHAN FILM FESTIVAL TO MARK 80TH BIRTHDAY... To mark the 80th birthday of actor #AmitabhBachchan, #FilmHeritageFoundation will organise a 4-day film festival - ‘Bachchan Back To The Beginning’ - in partnership with #PVRCinemas... From 8 - 11 Oct 2022 in 17 cities. pic.twitter.com/PkAYlxgC2i
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2022AMITABH BACHCHAN FILM FESTIVAL TO MARK 80TH BIRTHDAY... To mark the 80th birthday of actor #AmitabhBachchan, #FilmHeritageFoundation will organise a 4-day film festival - ‘Bachchan Back To The Beginning’ - in partnership with #PVRCinemas... From 8 - 11 Oct 2022 in 17 cities. pic.twitter.com/PkAYlxgC2i
— taran adarsh (@taran_adarsh) September 30, 2022
८ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये डॉन, काला पत्थर, कालिया, कभी कभी, अमर अकबर अँथनी, नमक हलाल, अभिमान, दीवार, मिली, सत्ते पे सत्ता आणि चुपके चुपके हे गाजलेले चित्रपट प्रदर्शित केले जातील. अमिताभ यांच्या दुर्मिळ आठवणींचे प्रदर्शन मुंबईतील जुहू येथील पीव्हीआर थिएटरमध्ये भरवले जाणार आहे.
हेही वाचा - 'आदिपुरुष'चा फर्स्ट लूक, धनुष्यधारी रामाच्या भूमिकेत प्रभास