मुंबई - Raid 2 : अभिनेता अजय देवगणच्या 'रेड ' या चित्रपटानं 2018 रोजी खूप धमाल केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. दरम्यान अजय देवगण त्याच्या 'रेड' चित्रपटाचा सीक्वेल घेवून येत आहे. 'रेड 2 'ची घोषणा 6 जानेवारी 2024 रोजी घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे प्रोडक्शन हाऊस पॅनोरमा स्टुडिओनं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर 'रेड 2' चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. अजय देवगणचे चाहते 'रेड'च्या सीक्वेलची वाट आतुरतेनं पाहत आहेत. अजय देवगणनं 2024 ची नवीन वर्षाची पहिली भेटही चाहत्यांना दिली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज कुमार गुप्ता हे करत आहे.
अजय देवगणचा आगामी चित्रपट : या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार आणि टी-सीरीज प्रॉडक्शन अंतर्गत होत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर अधिकारी अमेय पटनायकच्या भूमिकेत छापा टाकताना दिसणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, 'आयआरएस अधिकारी अमय पटनायक पुन्हा एकदा एका गुंतागुंतीच्या केससह परत येत आहेत, सस्पेन्स आणि जबरदस्त ड्रामा चित्रपट 'रेड'साठी तयार रहा. हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होईल.'' आज, 6 जानेवारीपासून मुंबईत 'रेड 2' या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये चित्रपटाच्या महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण होईल.
अजय देवगणचे आगामी चित्रपट : 'रेड 2' च्या आधी अजय देवगण 'सिंघम अगेन' या चित्रपटात त्याच्या अॅक्शन करताना दिसणार आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, करीना कपूर, अक्षय कुमार हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अजयच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'औरों में कहाँ दम था', 'गोलमाल 5', 'सन ऑफ सरदार 2', 'दे दे प्यार दे 2', 'मैदान ' आणि 'वश' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :