मुंबई भारतीय जनता पार्टी (भाजप) नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या अकाली निधनाने ( Sonali Phogat untimely demise ) सर्वांनाच धक्का बसला आहे. ही दुर्दैवी बातमी समजल्यानंतर हिंदी आणि हरियाणवी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील ख्यातनाम व्यक्तींसह अनेक लोकांनी सोशल मीडियावर मनःपूर्वक शोक व्यक्त केला आहे.
बिग बॉस सिझन १४ ( Bigg Boss 14 ) शोमधील त्यांच्या कार्यकाळात सोनाली फोगटला भेटलेल्या स्पर्धकांनीही तिच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. सोनाली फोगटच्या मृत्यूवर अभिनेता अली गोनीने( Actor Aly Goni ) ट्विटरवर तुटलेल्या हृदयाच्या इमोजीसह प्रतिक्रिया दिली. सोनाली फोगट ही मूळची हरियाणाची आहे व तिने बिग बॉस 14 मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता.
शो दरम्यान अली मध्ये एक चांगला मित्र सापडल्याचे सोनालीने म्हटले होते. अली गोनी हा स्पर्धक अभिनेत्री जस्मीन भसीनच्या ( Jasmin Bhasin ) प्रेमात आहे हे माहिती असतानाही तिने त्याच्याबद्दल भावना असल्याची कबुली तिने दिली होती. नंतर तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पुरुषाबद्दल भावना व्यक्त केल्याबद्दल तिला ट्रोल करण्यात आले. अलीने परिस्थिती चांगली हाताळली. त्याने सोनालीच्या भावनांचा अनादर केला नाही. खरं तर, सोनालीच्या शोमधून एलिमिनेशनच्या वेळी अलीने घराबाहेर पडल्यावर तिच्यासोबत डेटवर जाण्याचे वचन दिले होते.
धक्कादायक बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना बिग बॉस 14 मध्ये सहभागी झालेले इतर स्पर्धक सोशल मीडियावर भावूक झाले आहे. "या बातमीने खूप दुःख झाले. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. सोनाली फोगट," असे रुबिना दिलैकने सोनेल फोगटला ( Dilaik on Sonail Phogat death ) उद्देशून लिहिले आहे.
रुबिनाचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्ला ( Abhinav Shukla) यांनीही शोक व्यक्त केला. "सोनाली जीच्या अकाली निधनाने दुःखी आणि हताश. त्यांच्या मुलीसाठी मनापासून सहानुभूती आणि प्रार्थना. जीवन बेभरोशाचे आहे. मला पुन्हा एकदा 'आयुष्य आपल्या शेवटच्यासारखे जगा' या कोटची आठवण करून देते कारण एक दिवस तू बरोबर होणार आहेस. ओम शांती, " असे त्याने लिहिले. अलीप्रमाणेच रुबिना आणि अभिनव देखील बिग बॉस 14 मध्ये सोनाली फोगटचे सहस्पर्धक होते.
तिच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर सोनाली फोगटने 2019 ची हरियाणा विधानसभा निवडणूक आदमपूरमधून लढवली होती. पण काँग्रेस कुलदीप बिश्नोई यांच्याकडून तिला पराभव पत्करावा लागला होता. सोनाली भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि हरियाणा, नवी दिल्ली आणि चंदीगडच्या अनुसूचित जमाती शाखेच्या प्रभारी होत्या. वृत्तानुसार, अवघ्या 42 वर्षांच्या सोनाली फोगटचे मंगळवारी गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी आहे.
हेही वाचा - Hbd Saira Banu सायरा बानोंनी रंगवलेली अजरामर पात्रे