हैदराबाद - पुष्पा: द रुल चित्रपटाची प्रतीक्षा देशभर चाहते करत आहेत. पहिल्या भागात पुष्पाने केलेला थरथराट प्रेक्षक अद्यापही विसरलेले नाहीत. दर क्षणाला उत्कंठा वाढवत, शत्रूंच्या सर्व कारवाया नेस्तनाबूत करणारा पुष्पराज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. याच कथानकाचा पुढील भाग पुष्पा २ या सीक्वेलच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ८ एप्रिल रोजी अल्लु अर्जुनचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने निर्मात्यांनी त्याच्या रांगड्या लूकची झलक आज ७ एप्रिल रोजी समस्त चाहत्यांना भेट म्हणून दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
पुष्पा गायब झाला पण गेला कुठे ? - पुष्पा जेलमधून फरार झाल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडते. त्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलीस कोम्बिंग ऑपरेशन सुरू करतात. पुष्पाचे समर्थक रस्त्यवर उतरुन आंदोलन सुरू करतात. संपूर्ण देशात लोक हीच बातमी चवीने चर्वण करत असतात. पुष्पा कुठे आहे याचा शोध सुरू असताना त्याचा रक्ताळलेला ड्रेस पोलिसांना सापडतो. त्यामुळे जंगलात तो मारला गेला असावा असा संशय निर्माण होता आणि लोक पुन्हा रस्त्यावर उतरतात. हा सर्व गोंधळ सुरू असताना जंगलात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये एक वाघ दिसतो आणि त्या वाघाकडे पाहत पुष्पा जाताना दिसतो. साला झुकेगा नाही स्टाइल मारत पुष्पा दाढीवरुन हात फिरवतो आणि हे दृष्य टीव्हीवर प्रसारित होताच देशभर जल्लोष सुरू होतो असे या नव्या टिझरमध्ये दिसत आहे.
रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसानिमित्त मिळाली होतीश्रीवल्लीची पहिली झलक - पुष्पा: द रुलच्या निर्मात्यांनी रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटातील तिच्या पहिल्या लूकची झलक दाखवली होती. त्यावेळी त्यांनी तिचे फर्स्ट लूक पोस्ट रिलीज केले होते. यात ती पुन्हा एकदा श्रीवल्ली ही तिची गाजलेली व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. या दुसऱ्या भागातील तिचा लुक पहिल्या पुष्पा: द राइज पेक्षा वेगळा वाटत आहे.
पहिला टिझर - रश्मिकाच्या वाढदिवशी तिचे पोस्टर रिलीज केल्यानंतर काही वेळातच निर्मात्यांनी पुष्पाच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का दिला. चित्रपटाची पहिली दाखवणारा टिझर रिलीज करण्यात आला होता. यात पुष्पा तिरुपतीचा तुरुंघ फोडून गायब झाल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंत या बातमीने सर्वत्र खळबळ उडते. लोक रस्त्यवर येतात आणि मीडिया विचारत राहतो की, पुष्पा कुठं आहे?. याचा खुलासा ७ एप्रिल रोजी होणार असल्याचे टिझरमध्ये सांगण्यात आले होते. निर्मात्यांनी दिलेल्या या वचनानुसार ते आज जागले आणि त्यांनी पुष्पाची धमाकेदार झलक चाहत्यांसाठी पेश केली. उद्या अल्लु अर्जुन आपला वाढदिवस साजरा करणार आहे. यापार्श्वभूमीवर निर्मात्यांनी त्याच्या फॅन्ससाठी ही सर्वात मोठी भेट दिली आहे.