मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत नेहमी भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ बोलत असते. भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या इतर पक्षांना ते नेहमी सुनावत असते. त्यामुळे आगामी काळात किरण खेरची जागा कंगना घेईल असा अंदाज अनेकजण लावताना दिसतात. कंगना राजकीय क्षेत्रात उतरण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवार म्हणून चंदीगड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही माध्यामातून सुरू झाली होती. पण याबातमीचं स्वतः कंगनानंच खंडन केलंय.
या बातमीवर प्रतिक्रिया देताना कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या अफवांचे खंडन केलं. तिने एका हिंदी वृत्तवाहिनीचा फोटो पोस्ट केला ज्यामध्ये मथळा होता की, "चंदीगढवासियो मैं आ रही हू आपके शहर". कंगनाने स्पष्ट केलं की ही हेडलाइन तिचा कोट नाही आणि या सर्व केवळ अफवा आहेत.
दरम्यान, कंगनानं आपल्या राजकीय आकांक्षा कधीच लपवून ठेवलेल्या नाहीत. नोव्हेंबरमध्ये तिनं म्हटलं होतं की, भगवान कृष्णाचा आशीर्वाद मिळाल्यास ती पुढील लोकसभा निवडणूक लढवेन. ती अनेकदा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करत असते.
कामाच्या आघाडीवर कंगनाचा 'तेजस' हा अलिकडे रिलीज झालेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. गेल्या काही वर्षापासून तिचे एका पाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. 'तेजस'पूर्वी ती तमिळ कॉमेडी-हॉरर चित्रपटाचा सिक्वेल 'चंद्रमुखी 2' मध्ये नर्तकीच्या भूमिकेत दिसली होती. सध्या, कंगना तिचा 'तनु वेड्स मनू' सह-कलाकार आर माधवनसोबत एका चित्रपटासाठी पुन्हा काम करणार आहे. या चित्रपटाचं अद्याप शीर्षक ठरलेलं नाही. ती 'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात ती दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा -
2. अंकिता लोखंडेनं मुनावर फारुकीपासून स्वतःला केलं दूर, तर खानजादीला सोडायचा आहे शो
3. 'अॅनिमल'च्या स्क्रिनिंगला रणबीरचा टी शर्ट घातलेल्या आलियाच्या उपस्थितीनं वेधलं सर्वांचं लक्ष