मुंबई - महेश भट्ट यांनी काही दिवसापासून ह्रदयाच्या आजाराचा त्रास होता. यासाठी ते नियमित रुग्णालयात जाऊन चेकअप करत असून. त्यांच्या तब्येतीविषयी मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हृदयावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांचा मुलगा व आलियाचा भाऊ राहुल भट्टने सांगितले
महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्टने याबद्दल वडीलांच्या शस्त्रक्रियेबद्दलची माहिती दिली आहे. महेश यांना आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे राहुल भट्ट म्हणाला. आता त्यांची तब्येत बरी असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याचे व ते आराम करत असल्याचेही त्याने सांगितले.
दरम्यान, महेश भट्ट गेल्या महिन्यात त्यांच्या हृदयाच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, पण त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर महेश भट्ट यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व तपासण्या अंती डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशसीवीरित्या पार पडली आहे. आलिया भट्टने तिच्या सोशल मीडियावर अथवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याने महेश यांच्या अँजिओप्लास्टी शस्च्रक्रिया व प्रकृतीविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महेश भट्ट हे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. राज, जिस्म. पाप, मर्डर’ रोग, जहर, मर्डर २, जिस्म २ अशा चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्श त्यांनी केले आहे.
आलिया भट्टच्या लग्नात महेश भट्ट झाले होते भावूक - इतर वडिलांप्रमाणेच ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट देखील त्यांची मुलगी आलियाच्या लग्नानंतर भावूक झाले होते. आलियाची सावत्र बहीण पूजा भट्टने शेअर केलेल्या एका फोटोत विवाहानंतर महेश भट्ट आपला जावई रणबीरला आलिंगन देत असल्याचे दिसत आहे. रणबीर आणि महेश भट्ट यांच्या या फोटोमुळे अनेकांच्या भावना उचंबळल्या होत्या. लग्नानंतर रणबीर आणि तिच्या वडिलांमध्ये शेअर केलेले हृदयस्पर्शी क्षण पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केले. फोटो शेअर करताना पूजाने लिहिले, "जेव्हा मनापासून ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता असते तेव्हा कोणाला शब्दांची गरज असते? " वडिलांच्या आपल्या मुलीवरील प्रेमाबद्दल चाहत्यांना भावूक करणारे हे फोटो इंटरनेटवर आधीच व्हायरल झाले आहेत. आलिया आणि रणबीरचे गुरुवारी रणबीरच्या वांद्रे येथील वास्तू या निवासस्थानी झालेल्या एका इंटिमेट सोहळ्यात लग्न झाले.
हेही वाचा - Priyanka Chopra On Surrogacy : देसी गर्ल प्रियांकाने सरोगसीबद्दल केला खुलासा, ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर