ETV Bharat / entertainment

Alia Bhatt treats fans with BTS footage : आलिया भट्टने मातृत्व स्वीकारल्यानंतर 'हे' गाणे केले होते शूट.... - करण जोहर

अभिनेत्री आलिया भट्टने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामधील 'तुम क्या मिले' या गाण्याच्या पडद्याआडचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यात ती शूटिंग क्रूसोबत मस्ती करताना दिसत आहे.

Alia Bhatt
आलिया भट्ट
author img

By

Published : Jul 11, 2023, 5:35 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच ती रूपेरी पडद्यावर रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करेल असे दिसत आहे. कारण या चित्रपटाच्या प्रत्येक गाण्याला फार लाईक आणि हिट्स मिळत आहेत. नुकतेच आलिया भट्टने या चित्रपटामधील 'तुम क्या मिले' या गाण्याच्या शुट दरम्यानचा एक पडद्यामागील व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये चाहत्यांना गाण्याच्या शूटिंगदरम्यान झालेल्या सर्व मजेशीर गोष्टींची झलक पाहायला मिळत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' शुटिंग ही कश्मीरमध्ये झालेली आहे. हे गाणे आलियाचे डिलिव्हरीनंतर शूट करण्यात आले होते.

'तुम क्या मिले' गाणे आता यूट्यूबवर : मंगळवारी आलियाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर पडद्यामागचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले, माझे पहिले गाणे व्लॉग यूट्यूबवर आऊट झाले आहे! आता पहा (बायोमध्ये लिंक). दरम्यान 'तुम क्या मिले' हे गाणे डिलिव्हरीनंतर शूट केल्यानंतर तिला आधीच्या फिगरमध्ये येणे फार कठीण गेले होते. प्रसूतीनंतर सहा आठवड्यांनंतरच ती कसरत करू शकली होती.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

पडद्यामागचा व्हिडिओ : चित्रपट बनवताना अनेक आव्हाने असतात आणि हे खरोखरच आनंददायी असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पडद्यामागच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट झाले आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे कलाकार आणि क्रू बीटीएस (BTS)या व्हिडिओ क्लिपमध्ये चांगला वेळ एकत्र घालवत आहे. 'तुम क्या मिले'साठी डान्स सिक्वेन्स चित्रित करताना आलिया ही गोंधळताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पांढऱ्या साडीत कॅमेऱ्यासाठी पोझ देताना आलिया स्वतः अडखळताना दिसत आहे.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा ट्रेलर ४ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा हा चित्रपट कौटुंबिक जीवनावर आधारित आहे. 'तुम क्या मिले' या गाण्याची प्रशंसा समीक्षकांनी आहे. तर या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा :

  1. SPKK Collection : 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री...
  2. Stree 2 filming : ' पुन्हा एकदा चंदेरीत पसरला आतंक', स्त्री २ च्या शुटिंगला सुरुवात
  3. BB OTT 2 Highlights : बिग बॉस ओटीटी २ मधून सायरस ब्रोचाने 'या' कारणास्तव सोडले घर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.