ETV Bharat / entertainment

Ranbir Kapoor and Raha's viral picture : आलिया भट्टने रणबीर कपूर आणि राहा यांच्या व्हायरल फोटोमागील कहाणीचा केला खुलासा... - बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि मुलगी राहासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता या फोटोमागील कहाणीचा खुलासा तिने एका मुलाखती दरम्यान केला आहे.

Ranbir Kapoor and Rahas viral picture
रणबीर आणि राहाचा व्हायरल फोटो
author img

By

Published : May 13, 2023, 3:14 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला नोव्हेंबर 2022 मध्ये मुलगी राहा झाली. यानंतर कपूर कुटुंबाने राहाचे फार सुंदर रित्या त्यांच्या घरी स्वागत केले. रणबीर अनेकदा वडील झाल्याच्या आनंदाबद्दल बोलत असतो. आलियाने अलीकडेच एका मुलाखती दरम्यान सांगितले की, रणबीर हा राहाशी बोलण्याचा सराव कसा करत आहे, याबद्दल खुलासा केला. रोज त्यांच्या घराच्या बाल्कनीत बसून तो आपल्या मुलीशी बोलत असतो. तिला नवीन नवीन शब्द म्हणायला शिकवत असतो. रणबीर रोजचं राहाला फार वेळ देत असतो. काही दिवसांपूर्वी आलियाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर राहासोबत रणबीरचा एक फोटो शेअर केला होता. ज्यात रणबीर राहाला हात लावतांना दिसत आहे. आपला फोटो पत्नी घेत आहे, यांची कल्पना रणबीरला नव्हती.

आलियाने केला व्हायरल फोटोमागील कहाणीचा खुलासा : रणबीर आपल्या मुलीसोबत काळ्या-पांढऱ्या पोर्ट्रेटमध्ये प्रेमळपणे पोज देतांना दिसत आहे. आलियाने सांगितले की, रणबीर नेहमी राहाला त्याच्या आवडत्या ठिकाणी घेवून बसत असतो आणि तिच्यासोबत वेळ घालवून आनंद घेत असतो.आलियाने रणबीरसोबत राहाचा एक फोटो कलात्मक पद्धतीने घेतला आहे. तिने या फोटोमागची कहाणी उघड करत म्हटले की, 'राहाला हिरवळ ठिकाण खूप आवडते. ती प्रत्येक गोष्टी तेथील बघत असते. माझे पती तिला वारंवार या ठिकाणी घेऊन जातात आणि तिला तिथे घेवून बसवतात. तिची ती आवडती जागा आहे. रणबीर देखील तिच्या बाजूला बसतो. हिरवळ आणि वाऱ्याची झुळूक पाहत असताना तिच्याशी बोलत असतो, म्हणून तो एक क्षण असतो जो मला बघायला आवडतो. ते दोघे दररोज तिथेचं बसतात'.

आलिया आणि रणबीर पापाराझींना सांगितले मुलीचे फोटो न शेअर करायला: 'मी त्या दिवशी खूप कलात्मक झाले होते' असे तिने यावेळी म्हटले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या मुलीच्या चेहऱ्याचे फोटो न काढण्याबाबत कठोर धोरण अवलंबतात. तरीही, या जोडप्याने पापाराझींना सांगितले आहे की, त्यांच्या मुलीचे कोणतेही फोटो शेअर करू नये. आलिया आणि रणबीर हे नोव्हेंबर 2022 मध्ये पालक झाले. एप्रिल 2022 मध्ये त्यांनी लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : The Kerala Story Box Office : अदा शर्मा स्टारर वादग्रस्त चित्रपट 'द केरळ स्टोरी'चे 8 व्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.