मुंबई - आलिया भट्टला रणबीर कपूरसोबत लग्न करून मोजकेच दिवस झाले आहेत आणि तिने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. मंगळवारी ती एका खासगी विमानतळावर दिसली. तिचे इंटरनेटवर अनेक क्लिप आणि फोटो फिरत आहेत, यात फ्लाईट पकडण्यापूर्वी आलियाला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न हौशी फोटोग्राफर्स करताना दिसत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मंगळवारी आलिया कलिंगा विमानतळावर सुंदर गुलाबी सलवार कमीजमध्ये दिसली. वृत्तानुसार अभिनेत्री आलिया करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी जैसलमेरला जात आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी आलिया मुंबईत या चित्रपटाचे शूटिंग करत होती. रणबीरने देखील 17 एप्रिल रोजी पुन्हा काम सुरू केले, तो त्याच्या आगामी चित्रपट अॅनिमलसाठी टी-सीरीजच्या कार्यालयात दिसला होता.
जवळपास पाच वर्षे डेट केल्यानंतर आलिया आणि रणबीरने १४ एप्रिलला लग्न केले. या दोघांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेली प्रेमकहाणी अखेर पूर्णत्वास आली. दोघांनी जवळपास 50 पाहुण्यांसमोर अत्यंत खासगी विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
हेही वाचा - उर्फी जावेदच्या विचित्र फॅशनने चाहत्यांचे डोळे विस्फारले पाहा फोटो