ETV Bharat / entertainment

'तो काही छोटा अ‍ॅनिमल नाही', म्हणत आलिया भट्टनं व्यक्त केलं रणबीरवरील प्रेम - आलिया भट्टला गगन ठेंगणं

Alia Bhatt expressed her love for Ranbir :आलिया भट्टनं शनिवारी इन्स्टाग्रामवर तिचा पती रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'मधील अभिनयाचं कौतुक केलं. तिने काही फोटोही शेअर केले आहेत. त्यातील एक रणबीरचा त्यांची मुलगी राहा कपूरसोबतचा सुंदर फोटोही आहे.

Alia Bhatt expressed her love for Ranbir
आलिया भट्टनं व्यक्त केलं रणबीरवरील प्रेम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 3:43 PM IST

मुंबई - Alia Bhatt expressed her love for Ranbir : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला गगन ठेंगणं वाटू लागलंय. तिचा अभिनेता-पती रणबीर कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. 1 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटानं भारतात आधीच 70 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हे यश साजरं करण्यासाठी आलियानं तिच्या सोशल मीडियावर रणबीरचे दोन फोटो टाकले आणि त्याचं कौतुक करणारी एक मनःस्वी चिठ्ठी लिहिली.

शनिवारी आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीरचे दोन फोटो पोस्ट केले. तिनं केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक समर्पित वडील आणि पती म्हणून त्याची स्तुती केली. दिल्लीतील अ‍ॅनिमल ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान रणबीर चाहत्यांशी संवाद साधताना पहिल्या फोटोत दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये रणबीर आणि त्यांची मुलगी राहा कपूर यांच्यातील एक सुंदर क्षण कॅप्चर झाला आहे. फोटोत राहाचा चेहरा दिसत नसला तरी वडिलांच्या मांडीवर विसावलेले तिचे छोटे पाय मनाला स्पर्श करणारे आहेत.

कॅप्शनमध्ये आलिया भट्टनं रणबीरच्या ऑन आणि ऑफ कॅमेर्‍यावरील त्याच्या कलेबद्दलच्या त्याच्या समर्पणाचं कौतुक केलं. रणबीरचा संयम, प्रेम आणि समर्पण यावरही चिठ्ठीतून प्रकाश टाकला. तो एक प्रेमळ कौटुंबिक माणूस असल्याबद्दल तिनं त्याचं कौतुक केलं. तिनं रणबीरच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याचं अभिनंदन करून आणि सर्वकाही 'इतके सोपे' असल्याचे सांगून समारोप केला. 'तो काही छोटा अ‍ॅनिमल नाही', म्हणत आलियाच्या बोलण्यातून रणबीरबद्दल अभिमान आणि प्रेम दिसून आलं.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अलिकडेच 'अ‍ॅनिमल'चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडलं तेव्हा रणबीर कपूरचा या चित्रपटातील लूक असलेल्या फोटोचा टी शर्ट घालून आलिया भट्ट आली होती. यावेळी अनेक सेलेब्रिटी हजर होते मात्र सर्वांचं लक्ष आलियानच वेधून घेतलं होतं.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती दिमरी यांच्‍या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरू आहे. रणबीर कपूरच्या आजवरच्या कारकिर्दीतील पहिल्या दिवशी सर्वात जास्त करणारा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट ठरला आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं पहिल्या दिवशी 70 कोटीची कमाई केली आहे.

1. अमिताभ बच्चन यांचा करियरवर प्रभाव असल्याचा रणवीर सिंगनं केला खुलासा

2. अक्षय कुमारचा 'मिशन राणीगंज' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित

3. गिरीश ओक यांचा 'काकाजी', नाटक जुनं पण भूमिका ताजी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.