ETV Bharat / entertainment

हॉलिवूड चित्रपट कसा मिळाला याचा आलिया भट्टने केला खुलासा - Alia Bhatt Heart of Stone

आलिया भट्ट हॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे. गल गडॉटची भूमिका असलेल्या हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाद्वारे आलिया हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. रिलीजची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आणि या संदर्भात अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

आलिया भट्ट हॉलिवूड पदार्पण
आलिया भट्ट हॉलिवूड पदार्पण
author img

By

Published : Aug 27, 2022, 11:52 AM IST

मुंबई आलिया भट्ट ( Alia Bhatt ) सध्या तिचा पती आणि रणबीर कपूरोबत ( Ranbir Kapoor ) ब्रह्मास्त्रच्या ( Brahmastra ) प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाभोवती बरीच चर्चा होत असताना, ती हॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे हे विसरुन चालणार नाही. गल गडॉटची ( Gal Gadot ) भूमिका असलेल्या हार्ट ऑफ स्टोन ( Heart of Stone ) या चित्रपटाद्वारे आलिया हॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.

एका मॅगझिनशी बोलताना आलियाने हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाबाबत सर्वकाही कसे चालले याचा खुलासा केला आहे. हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट तिच्याकडे कसा आला आणि आलियाला हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याबद्दल काय म्हणायचे आहे असे विचारले असता ती म्हणाली, "माझ्या टीमने मला स्क्रिप्ट पाठवली आणि ते म्हणाले, तू ही स्क्रीप्ट वाचलेली त्यांना आवडेल आणि जर तुला आवडली किंवा तुला रस वाटला तर आपण झूम मिटींगमधून त्यांच्या दिग्दर्शकाशी भेटू.''

"झूमचे आभार, हे बरेच काही शक्य झाले आहे. तुम्हाला मीटिंगसाठी इतका लांबचा विमान प्रवास करण्याची गरज नाही. तुम्हाला वैयक्तिक बैठक करण्याची गरज नाही. तुम्ही व्हर्च्युअल मीटिंग करू शकता. मी स्क्रिप्ट वाचली आहे आणि अर्थातच मी ऐकले आहे की गॅल यात अभिनय करणार आहे आणि तिची निर्मिती देखील करत आहे. मी तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक होते कारण मी तिच्या कामाची प्रशंसक आहे.", असेही आलिया म्हणाली.

''ती या भूमिकेकडे कशामुळे आकर्षित झाली असे पुढे विचारले असता, आलियाने उत्तर दिले की ती प्रथम स्क्रिप्टच्या प्रेमात पडली. ती म्हणाली, "माझ्यासाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मला एक अभिनेत्री म्हणून बोर्डावर यायचे असेल, तर मला त्या भागाबद्दल 100% खात्री असणे आवश्यक आहे. अन्यथा मला वाटते की मी चंगले करण्यापेक्षा चित्रपटाचे नुकसान करत आहे,'' असे हॉलिवूड पदार्पणाबाबत आलिया म्हणाली.

"म्हणून मी म्हणाले की, पहिल्यांदा मला स्क्रिप्टच्या प्रेमात पडायला हवे. आणि मला स्क्रिप्ट मिळाली आणि मी आजवर केलेल्या केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. मी स्क्रिप्टबद्दल जास्त बोलू शकत नाही, पण मला सांगायचे आहे की मी खूप रोमांचित झाले कारण तो खूप चांगला भाग होता. माझ्यासाठी हॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचा हा एक उत्तम मार्ग होता, चला तो तसाच ठेवूया. मग मी झूमवर माझे दिग्दर्शक टॉम हार्पर यांच्याशी भेटले. आम्ही लगेच या विषयावर पक्के केले आणि पुढची गोष्ट तुम्हाला माहीत आहे की मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होते," आलिया हार्ट ऑफ स्टोनच्या भूमिकेबाबत म्हणाली.

हार्ट ऑफ स्टोन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. रिलीजची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही आणि या संदर्भात अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा - मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसच्या सत्यप्रेम की कथाची प्रदर्शन तारीख जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.