मुंबई : बॉलिवूड कपल विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ आलिया भट्टसोबत गप्पा मारत मुंबई विमातळवर लाउंजमध्ये दिसली. त्यांचा गप्पा मारताचा व्हिडिओ हा सध्याला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आलिया ही लाउंजमध्ये प्रवेश करताना विक्कीला मिठी मारताना दिसत आहे. त्यानंतर आलिया, कॅटरिना आणि विक्की एका टेबलाभोवती बसून एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे. दरम्यान, काही चाहत्यांनी असा विचार केला की या तिघांचा चर्चेचा विषय रणबीर कपूर असेल. पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओत बॉलीवूड कपल विक्की आणि कॅटरिना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर यावेळी आलियाने तिच्या केसांना पोनीटेल बांधली आहे. याशिवाय तिने रंगीबेरंगी क्रोप टॉप परिधान केले आहे.
नेटफ्लिक्स टुडम 2023 : गुरुवारी सकाळी, आलिया साओ पाउलो येथील नेटफ्लिक्स टुडम 2023 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ब्राझीलला रवाना झाली. त्याचवेळी, विमानतळाबाहेर तैनात असलेल्या पापाराझीने विक्की, कॅटरिना आणि आलियाला मुंबई विमानतळावर पाहिले होते. विक्की, कॅटरिना आणि आलियाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने कमेंट केली, कॅटरिना ते आलिया और बताओ रणबीर कैसे है?' (कॅटरिना ते आलिया आणि मला सांगा रणबीर कसा आहे?)' तर दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, 'रणबीर की शिकायत कर रही होगी (रणबीर तक्रार करत असेल)'. अशा कमेंट या व्हिडिओवर आल्या आहे. हॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नेटफ्लिक्सच्या हार्ट ऑफ स्टोन या अॅक्शन फिल्मच्या कलाकार सदस्यांपैकी एक म्हणून आलिया ही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तिचे सह-कलाकार गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन हे देखील टॅलेंट लाइन-अपमध्ये असणार आहेत. आलिया शिवाय या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, निर्माता बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा देखील सहभागी होणार आहेत.
वर्कफ्रंट : दरम्यान, तिघाच्या वर्कफ्रंटवर बोलायचे झाले तर , विक्की अलीकडेच सारा अली खानसोबत 'जरा हटके जरा बचके' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसला होता. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दुसरीकडे कॅटरिना आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट टायगर 3मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट 2023 च्या दिवाळीच्या वेळी चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय ती फरहान अख्तर दिग्दर्शित आगामी चित्रपट 'जी ले जरा'मध्ये आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत देखील रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तसेच आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती पुढे दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि जी ले जरा मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :