ETV Bharat / entertainment

आलिया भट्टनं जिवलग मैत्रिणीच्या हळदी समारंभात लावली हजेरी, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - alia bhatt latest viral photo

Alia Bhatt Friends Pre Wedding Pics : अभिनेत्री आलिया भट्टनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या बेस्ट फ्रेंडच्या हळदीच्या समारंभात आनंद व्यक्त करताना दिसत आहे

Alia Bhatt Friends Pre Wedding Pics
आलिया भट्टच्या फ्रेंड्सच्याप्री वेडिंगचे फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 11:05 AM IST

मुंबई - Alia Bhatt Friends Pre Wedding Pics : अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच तिच्या चित्रपटांमुळं चर्चेत असते. अलीकडेच आलिया तिच्या मैत्रिणीच्या प्री-वेडिंग फंक्शनला पोहोचली होती. आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये आलिया तिच्या बेस्टीसोबत मस्ती करताना दिसत आहे. आलियानं आपल्या उपस्थितीनं लग्नाच्या या कार्यक्रमांमध्ये रंगत आणली आहे. बुधवारी रात्री आलियानं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ती आपल्या जिवलग मैत्रिणीसोबत दिसत आहे.

आलिया भट्टनं शेअर केले सुंदर फोटो : शेअर केलेल्या फोटोमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंसोबत आलियानं कॅप्शनमध्ये लिहिलं, खूप प्रेम". आलियाच्या या फोटोंना चाहते खूप पसंत करून यावर कमेंट करत आहेत. एका यूजरनं या फोटोवर कमेंट करत लिहिलं, ''तू खरचं खूप सुंदर दिसत आहे''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''आलिया तुमचा पाचवा फोटो खूप खास आहे, मला तुमचे फोटो आवडले'. आणखी एकानं लिहिलं, ''आलिया ही नेहमीच सुंदर दिसते, मात्र या फोटोमध्ये अप्रतिम दिसत आहे''. असा अनेक कमेंट या फोटोवर येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर कमेंट करून हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

आलिया भट्टचं लूक : आलियानं फोटोमध्ये गुलाबी रंगाचा सलवार सूटसह सुंदर इयररिंग घातले आहेत. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला आहे. 2023 हे वर्ष आलियासाठी खास होते. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही आलिया भट्टनं निर्माता करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'द्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हा चित्रपट आलियाचा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. सुपरहिट चित्रपट देण्यासोबतच यावर्षी आलियाला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब मिळाला आहे. 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'जिगरा', 'इन्शाअल्लाह', 'तख्त' आणि 'जी ले जरा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. ईशा मालवीयनं अभिषेक कुमारवर हात उगारल्याचा केला आरोप
  2. मुनावर फारुकी ठरणार बिग बॉस 17 च्या घराचा पहिला कॅप्टन?
  3. अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीनं केला ब्रेकअपचा खुलासा, जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.