ETV Bharat / entertainment

Ali Mercchant Got married : अभिनेता अली मर्चंटनं मॉडेल अंदलीब जैदीशी केलं लग्न; फोटो व्हायरल - Ali Mercchant

Ali Mercchant Got married : अभिनेता अली मर्चंटनं मॉडेल अंदलीब जैदीशी लग्न केले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. अली मर्चंटचे हे तिसरे लग्न आहे.

Ali Mercchant Got married
अली मर्चंटचे लग्न झाले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 1:06 PM IST

मुंबई - Ali Mercchant Got married : टेलिव्हिजन अभिनेता अली मर्चंटनं मॉडेल अंदलीब जैदीशी गुरुवारी लखनऊमध्ये लग्न केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. या कपलनं यावर्षी ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंट केली होती. दरम्यान आता पारंपारिक रितीरिवाजानुसार या जोडप्याचा निकाह सोहळा पार पडला. या लग्नात अली आणि अंदलीबचे कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थितीत होता. अली मर्चंटचे हे तिसरे लग्न आहे, त्याचे पहिले लग्न अभिनेत्री सारा खानसोबत झाले होते. त्याच ते लग्न दोन महिनेही टिकले नाही. त्यांचं दुसर लग्न अनम मर्चंटसोबत झालं होत. अनम आणि अली लग्नाच्या पाच वर्षांनंतर वेगळे झाले.

अली मर्चंटनं केलं लग्न : आता त्यानं हैदराबादची मॉडेल अंदलीब जैदीसोबत तिसरे लग्न केले आहे. लग्नाचे फोटो शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, 'आता आम्ही कायमचे हँग आउट करू शकतो, आनंदाची सुरुवात झाली' फोटोमध्ये दोघेही खुप सुंदर दिसत आहेत. पुढं त्यानं लिहलं त्यानं की, 'मला तुझ्यासोबत हसायला, तुझ्यासोबत रडायला, तुझी काळजी घ्यायला आणि तुझ्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला आवडतात. मला तुझ्याबरोबर धावणे, तुझ्याबरोबर चालणे, तुझ्याबरोबर जगणे आवडते. मला तुमच्यासोबत राहायचे आहे आणि तुला नेहमीच पाठिंबा द्यायचा आहे. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करते'.

फोटो झाले व्हायरल : फोटोमध्ये अली हा अंदलीबकडे प्रेमानं पाहत आहे. या जोडप्यानं लग्नात क्रीम रंगाच्या पोशाख घातला. अलीनं फुलांचा सेहरा घातला आहे. याशिवाय त्यानं गळ्यात माळ घातली आहे. दुसरीकडे अंदलीबनं भारी दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला. यावर तिनं न्यूड मेकअप केला आहे. अली मर्चंट आता 15 नोव्हेंबरला मुंबईत आपल्या लग्नाचे रिसेप्शन देणार आहे. मीडियासोबत बोलताना त्यानं सांगितलं की, तो अंदलीबसोबत लग्न केल्यामुळे खूप खुश आहे. अलीनं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट करून त्याचे अभिनंदन करत आहे. एक चाहत्यानं कमेंट करत म्हटलं, 'तुमची जोडी खूप सुंदर आहे' दुसऱ्या एकानं लिहलं, 'अभिनंद तुमच्या दोघांना अल्ला खुश ठेवणार'. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.

हेही वाचा :

  1. Ira Khan Pre Wedding Functions : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खानच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात
  2. Creation of a Sanskrit band : पुण्यात संस्कृत बँडची स्थापना, 'श्रीवल्ली'सह लोकप्रिय गाण्यांचं संस्कृतमधून सादरीकरण
  3. Uorfi Javed viral video : पोलिसांची बदनामी अंगलट, व्हायरल व्हिडिओ प्रकरणी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.