ETV Bharat / entertainment

Akshay Kumar's entry in Pushpa 2 : पुष्पा २ मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री, सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Pushpa 2 sparks discussion on social media

पुष्पा या चित्रपटाचा एक टिझर नुकताच रिलीज झाला. रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसानिमित्य तिचा श्रीवल्ली लुकही निर्मात्यांना शेअर केला. आता अल्लु अर्जुनच्या वाढदिवसानित्य त्याच्या लुकची प्रतीक्षा चाहते करत आहेत. अशावेळी पुष्पा २ मध्ये अक्षय कुमार एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पुष्पा २ मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री
पुष्पा २ मध्ये अक्षय कुमारची एन्ट्री
author img

By

Published : Apr 6, 2023, 3:43 PM IST

मुंबई - पुष्पा २ या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते मनापासून करत आहेत. रश्मिका मंदान्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक टिझर रिलीज करण्यात आला आणि तिचा श्रीवल्ली लुकही निर्मात्यांना शेअर केला. यापूर्वी अशी एक अफवा पसरली होती की या चित्रपटातील सीन्स दिग्दर्शक सुकुमारनला आवडले नसल्यामुळे ते सीन्स तो पुन्हा शूट करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचा टिझरही लेट रिलीज होऊ शकतो. पण रश्मिकाच्या वाढदिवसानिमित्य टिझर आला आणि ८ तारखेला अल्लु अर्जुनचाही वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ७ एप्रिल रोजी पुष्पाबाबत आणखी एक धमाका निर्माते करणार आहेत. यासाठी अजून मोजून काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण सध्या एका नव्या विषयाची चर्चा सुरू आहे ती म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमारची एन्ट्री होणार.

अक्षयने केले होते पुष्पाचे कौतुक - पुष्पा हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता. तेव्हा अक्षयला हा चित्रपट खूप आवडला होता. या टीमचे अभिनंदन करताना त्याने आगामी काळात तुमच्यासोबत काम करायला आवडेल असे म्हटले होते. मधल्या काळात पुष्पा २ मध्ये बॉलिवूड स्टारची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली होती. यामध्ये सुरुवातीला अर्जुन कपूरचे नाव घेतले जात होते. त्यानंतर आणखीही मोठ्या नावाची चर्चा रंगली होती. आता ही चर्चा अक्षय कुमारच्या नावापर्यंत येऊन पोहोचली आहे. ही अफवा जर खरी ठरली तर अक्षयच्या चाहत्यांसाठी ती एक मोठी आनंदाची बातमी ठरु शकते. कारण गेल्या काही चित्रपटांनी अक्षय कुमारला बॉक्स ऑफिसवर दगा दिला आहे.

अक्षय कुमारचा पुष्पा २ मध्ये कॅमिओ - पुष्पा चित्रपटाच्या अखेरीस दाक्षिणात्य हरहुन्नरी अभिनेता फहद फजिलची पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत एन्ट्री होती. तेव्हाच पुढील भागात पुष्पा म्हणजेच अल्लु अर्जुन आणि फहद फजिल यांच्या तगडा झगडा होणार हे स्पष्ट झाले होते. मात्र फहदलाही सपोर्ट म्हणून अक्षय कुमार मध्यंतरानंतर कॅमिओ करु शकतो, असा नवा तर्क समोर येत आहे.

हेही वाचा - Bipasha Basu Reveals Daughter : बिपाशा बासूने दाखवला मुलगी देवीचा चेहरा; चाहते म्हणाले ती तिच्या वडिलांसारखी दिसते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.