ETV Bharat / entertainment

Akshay kumar upcoming movies 2024 : अक्षय कुमारचे आगामी चित्रपट लवकरच येणार रूपेरी पडद्यावर... - आगामी चित्रपटाची यादी

अक्षय कुमारचा 'ओएमजी २' चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप धमाल करत आहे. आता अक्षयच्या आगामी चित्रपटाची लिस्ट समोर आली आहे. अक्षय हा २०२४ मध्ये चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्या चित्रपटांबद्दल...

Akshay kumar
अक्षय कुमार
author img

By

Published : Aug 17, 2023, 4:14 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार 'ओएमजी २' मुळे सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज झाला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अक्षयचा 'ओएमजी २' चित्रपट १०० कोटी क्लबकडे वाटचाल करत आहे. याशिवाय दुसरीकडे, 'ओएमजी २' सोबत 'गदर २' चित्रपट देखील रिलीज झाला होता. 'गदर २' हा चित्रपट कमाईच्या बाबतीत 'ओएमजी २' पेक्षा पुढे आहे. आता 'खिलाडी'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारचे २०२४ मध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट येणार आहेत. २०२४ मध्ये अक्षय कुमारचे तीन मोठे चित्रपट ईद, दिवाळी आणि ख्रिसमसला रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहेत, ही अक्षयच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी असणार आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' कधी रिलीज होणार : १० एप्रिल २०२४ रोजी ईदच्या दिवशी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीज होणार आहे. हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला आहे.

हाऊसफुल ५ कधी रिलीज होणार : अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट 'हाऊसफुल ५' २०२४ च्या दिवाळीला धमाका करायला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख व्यतिरिक्त अनेक स्टार्स कॉमेडीचा धडाका लावताना दिसणार आहेत.

'वेलकम टू द जंगल' कधी रिलीज होणार : अक्षय कुमारचा आणखी एक मोठा चित्रपट वेलकम ३, म्हणजेच 'वेलकम टू द जंगल' २०२४ मध्ये ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अक्षय कुमार, संजय दत्त, अर्शद वारसी, दिशा पटानी आणि जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

अक्षय कुमारचे इतर आगामी चित्रपट

  • 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' (५ ऑक्टोबर २०२३)
  • 'सूरराई पोत्रू' रिमेक (१६ फेब्रुवारी २०२४)
  • 'स्काय फोर्स' (२०२४)
  • 'हेरा फेरी' ३
  • जॉली एलएलबी ३
  • सी शंकरनारायण बायोपिक
  • सिंघम अगेन (ऑगस्ट २०२४)

हेही वाचा :

  1. Urfi Javed receives death threats : उर्फी जावेदला मिळाली जीवे मारण्याची धमकी...
  2. Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभू 'खुशी'च्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान झाली भावूक...
  3. Jailer box office Collection Day 7 : 'जेलर' चित्रपटाने जगभरात ओलांडला ४०० कोटींचा टप्पा ...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.