मुंबई - PM Modi and Akshay kumar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय रेडिओ शो 'मन की बात'च्या ताज्या भागात त्यांनी सर्वांना फिटनेससाठी प्रेरित केलं आहे. याशिवाय या शोमध्ये बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनं त्याचा फिटनेस मंत्र शेअर केला आहे. श्रोत्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला अक्षयनं दिला आहे. निरोगी जीवनशैलीसाठी समर्पित असलेल्या अक्षयनं फॅन्सी जिमच्या नकारात्मक परिणामांबद्दल सांगितलं आहे. याशिवाय त्यानं नैसर्गिक पद्धतीने तंदुरुस्त राहण्यासाठी फॅन्सी जिमपेक्षा पोहणे, बॅडमिंटन खेळणे, पायऱ्या चढणे, व्यायाम करणे, चांगले आरोग्यदायी अन्न खाणं याबद्दल सांगितलं आहे.
अक्षय कुमारचा फिटनेस मंत्र : अक्षय कुमारनं म्हटलं, ''माझा विश्वास आहे की, शुद्ध तूप जर योग्य प्रमाणात सेवन केले तर ते आपल्यासाठी फायदेशीर आहे''. तरुण लोकांमध्ये तूपविषयी गैरसमज काढण्याचं काम अक्षयनं केलं आहे. निरोगी जीवनशैलीसाठी त्यानं यावेळी अनेक टिप्स श्रोत्यांना दिल्या आहेत. 'सिक्स-पॅक' किंवा 'एट-पॅक' ऍब्स मिळविण्यासाठी स्टिरॉइड्स वापरणं, चूकचं असल्याचं त्यानं सांगितलं. याशिवाय अक्षय कुमारनं फिटनेस मंत्र देत पुढं म्हटलं, ''मित्रांनो, अशा शॉर्टकटने शरीर बाहेरून फुगते पण आतून पोकळ होते. लक्षात ठेवा की हे शॉर्टकट तुमचे आयुष्य कमी करू शकतात. आतापासून, फिल्टर जीवन जगू नका, एक फिटर जीवन जगा''. अशा संदेश त्यानं या शोमधून दिला आहे.
वर्क फ्रंट : अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो टायगर श्रॉफ आणि सोनाक्षी सिन्हासोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये प्रदर्शित होईल. अक्षयकडे 'हाऊसफुल 5' हा कॉमेडी चित्रपटही आहे. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'वेलकम टू द जंगल'मध्येही दिसेल. अक्षय कुमार व्यतिरिक्त वेलकम टू द जंगलमध्ये संजय दत्त, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, किकू शारदा हे कलाकार आहेत. याशिवाय अक्षय कुमारकडे 'हेरा-फेरी 3' देखील चित्रपट आहे, ज्यात सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा :