ETV Bharat / entertainment

Mission Raniganj teaser out: अक्षय कुमार स्टारर 'मिशन राणीगंज'चा टिझर झाला प्रदर्शित...

Mission Raniganj teaser out : अक्षय कुमार त्याच्या आगामी 'मिशन राणीगंज' या आगामी चित्रपटात खऱ्या आयुष्यातील नायकाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाची टॅगलाइन आधी 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' अशी होती आता ही टॅगलाइन बदलून 'द ग्रेट भारत रेस्क्यू' करण्यात आली आहे.

Mission Raniganj teaser out
मिशन राणीगंजचा टिझर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 8:19 PM IST

मुंबई - Mission Raniganj teaser out : 'ओएमजी 2' चित्रपटानंतर अक्षय कुमार आता आगामी चित्रपट 'मिशन राणीगंज'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आज म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कहाणी ही सत्य घटनवारवर आधारित असून या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज झाले होते. या चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारचा लूक हा हटके अंदाजात दिसणार आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट 'मिशन रानीगंज'चा टिझर हा प्रदर्शित झाला आहे. 'मिशन राणीगंज'चे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई यांनी केले असून पूजा एंटरटेनमेंटद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मिशन रानीगंज'चा टिझर रिलीज : अक्षय कुमारच्या या चित्रपटाचे आधीचे नाव 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असे होते. मात्र आता ते 'मिशन राणीगंज' असे बदलण्यात आले आहे. यापूर्वी या चित्रपटासाठी कोणतीही टॅगलाइन नव्हती, परंतु आता चित्रपटाच्या शीर्षकात एक टॅगलाइन जोडली गेली आहे. 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' च्या जागी 'भारत' अशी टॅगलाइनही देण्यात आली आहे. भारत सरकारने 'इंडिया' ऐवजी 'भारत' हे नाव वापरण्याचा आग्रह सुरू केल्यानंतर अक्षयने देखील चित्रपटाच्या शीर्षकात 'भारत' हा शब्द जोडणार असल्याचे समजत आहे.

सत्यकथेवर आधारित : हा चित्रपट जसवंत सिंग गिल या खाण अभियंता यांच्या सत्यकथेवर आधारित आहे, ज्यांनी 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथील पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या 64 खाण कामगारांचे प्राण वाचवले होते. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त परिणीती चोप्रा, राजेश शर्मा, रवि किशन, वीरेंद्र सक्सेना, अनंत महादेवन, दिव्येंदू भट्टाचार्य आणि गौरव प्रतीक हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे मोशन पोस्टर जेव्हा रिलीज झाले होते. तेव्हा अक्षय कुमारचे खूप कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय हा आपल्यासोबत काही कामगारांना गाईड करताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये रानीगंजमधील पूरच्या वेळी जी अवस्था झाली होती. तिच परिस्थिती मांडण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. Jawan Box Office Collection : पहिल्याच दिवशी शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट घेणार मोठी झेप...
  2. Jawan Day १ Box Office : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट चाहत्यांवर करत आहे जादू...
  3. Shah Rukh Khan Jawan Movie : 'जवान' चित्रपटाद्वारे शाहरुख खाननं जिंकली चाहत्यांची मनं...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.