ETV Bharat / entertainment

'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शुटिंगला सुरुवात, अक्षय कुमारने शेअर केली महाराजांची झलक - Mahesh Manjrekar

अक्षय कुमार ( Akshay Kumar ) महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला आता सुरुवात झाली आहे. अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेट अपमधील व्हिडिओ पोस्ट केला आहे. यातून महाराजांची दमदार झलक पाहायला मिळत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 6, 2022, 10:55 AM IST

Updated : Dec 6, 2022, 12:26 PM IST

मुंबई - अक्षय कुमार ( Akshay Kumar ) महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार ( Akshay play role of Chhatrapati Shivaji Maharaj ) आहे. 'वेडात मराठे वीर दौडले सात'ची निर्मिती वसीम कुरेशी करत आहेत. इतिहासाच्या सर्वात गौरवशाली पानांपैकी एक लिहून शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे एकमेव ध्येय असलेल्या सात शूर योद्ध्यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याचे ट्विटरवरुन कळवले आहे. त्यांनी लिहिलंय, ''छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असलेल्या अक्षय कुमार अभिनित व महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या शुटिंगला आज सुरुवात होत आहे. ''

दरम्यान, अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेट अपमधील व्हिडिओ पोस्ट केला आहे. यातून महाराजांची दमदार झलक पाहायला मिळत आहे. परंतु व्हिडिओच्या अखेरीस झुंबर दिसत असून यात लागलेले विद्युत दिवे खटकणारे आहेत. याच्या कॅप्शनमध्ये अक्षयने, जय भवानी, जय शिवाजी ! असे लिहिले आहे.

आपल्या मराठी पदार्पणाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना अक्षय म्हणाला होता की, ''माझ्यासाठी ही एक स्वप्नवत भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. जेव्हा सरांनी मला ही भूमिका साकारायला सांगितली तेव्हा मी थक्क झालो. ही भूमिका साकारताना मला खूप छान वाटत आहे आणि माझ्यासाठी ही एक स्वप्नवत भूमिका असणार आहे. तसेच, मी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करणार आहे आणि हा एक अनुभव असणार आहे.''

आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपट २०२३ मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज केला जाणार आहे.

हेही वाचा - 'हेरा फेरी भाग ३' मध्ये झळकणार अक्षय कुमार?

Last Updated : Dec 6, 2022, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.