ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारने शेअर केला स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळील फोटो

हेरा फेरी 3 चित्रपट सोडल्यानंतर अक्षय कुमार निराश झाला असल्याचा तर्क चाहत्यांनी काढला आहे. कारण या सगळ्या वादात अक्षयने त्याच्या एकांतवासाचा फोटो शेअर केला आहे.

Etv Bharat
अक्षय कुमारने शेअर केला स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळील फोटो
author img

By

Published : Nov 14, 2022, 11:51 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच त्याला हेरा फेरी या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटाच्या भाग 3 मधून काढून टाकण्यात आल्याची बातमी आली होती. मात्र एका मीडिया मुलाखतीत अक्षय कुमारने चित्रपटाच्या फीच्या वादामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले. हा चित्रपट सोडल्याबद्दल अक्षयने त्याच्या चाहत्यांची माफीही मागितली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षयने या चित्रपटासाठी 90 कोटी रुपये मागितले होते, परंतु हे शक्य झाले नाही आणि अक्षय कुमारची भूमिका अभिनेता कार्तिक आर्यनकडे गेली. या सगळ्या वादात आता अक्षयने त्याच्या एकांतातील एक फोटो शेअर केला आहे.

  • I am in Ekta Nagar, home to ‘Statue of Unity’ the world’s tallest statue. So much to do here in the lap of nature.

    Have you been here? pic.twitter.com/4UsVoWmw4N

    — Akshay Kumar (@akshaykumar) November 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अक्षय कुमार निसर्गाच्या कुशीत - अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अक्षय कुमारने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''मी एकता नगरमध्ये आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ, जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे. इथे निसर्गाच्या कुशीत खूप काही करायचे आहे, तुम्ही इथे आला आहात का?''

अक्षयचे चाहते म्हणाले, कृपया 'हेरा फेरी 3' सोडू नको - अभिनेत्याच्या या फोटोवर आता त्याच्या चाहत्यांच्या निराश आणि भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्याचे चाहते त्याला 'हेरा फेरी 3' चित्रपट सोडू नको असे आवाहन करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, 'सर, तुम्ही संपूर्ण जग फिरलात तरी कृपया हेरा फेरी 3 सोडू नका'. दुसरा चाहता लिहितो, 'आम्ही सर्व चाहते तुमच्या हेरा फेरी 3 ची फी देणगी देऊन भरू, राजू भाई यांनी हेरा फेरी 3 वर सही केली,' तर दुसरा युजर लिहितो, 'सर, तुमच्याशिवाय हेरा फेरी 3 होऊ शकणार नाही.'

हेही वाचा - सामंथाने यशोदासाठी घेतलेल्या कठोर प्रशिक्षणाचा व्हिडिओ केला शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.