ETV Bharat / entertainment

'OMG 2' teaser : 'ओह माय गॉड २' ची प्रतिक्षा संपली... अक्षय कुमारने जाहीर केली तारीख - कॉमेडी चित्रपट

अक्षय कुमारच्या २०१२ मधील हिट कॉमेडी चित्रपट 'ओह माय गॉड २'चा सिक्वेल हा ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यासोबत सनी देओलचा 'गदर २' देखील ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिलीजपूर्वी निर्मात्यांनी 'ओह माय गॉड २'च्या टीझरची तारीख जाहीर केली आहे.

OMG 2
ओह माय गॉड २
author img

By

Published : Jul 10, 2023, 10:18 AM IST

मुंबई: अक्षय कुमारचा आगामी कॉमेडी-ड्रामा चित्रपट 'ओह माय गॉड २'चा टीझर रिलीज करण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षयने इंस्टाग्रामवर टीझरच्या घोषणेसह त्याच्या व्यक्तिरेखेचा एक मनोरंजक व्हिडिओ चाहत्यांसमोर शेअर केला, ज्यामध्ये 'ओह माय गॉड २'चा टीझर या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मनोरंजक व्हिडिो केला शेअर : अक्षय कुमारने रविवारी इंस्टाग्रामवर एक मनोरंजक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये, अक्षय कपाळावर राख, निळा रंग आणि गळ्यात रुद्राक्षचा हार आणि गुडग्यापर्यत लंबी वेणी घातलेला दिसत आहे. तसेच तो लोकांच्या गर्दीतून फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर लोक 'हर हर महादेव' असे म्हणत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, 'ओह माय गॉड २'चा (OMG 2) टीझर ११ जुलै रोजी रिलीज होणार आहे. 'ओह माय गॉड २' (OMG 2) हा ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दिसणार आहे.

पोस्टवर आल्या भरभरून कमेंट : चित्रपटाचा टीझर जाहीर होताच अक्षयच्या चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील लोकांनी या पोस्टवर कमेंट देण्यास सुरुवात केली. या पोस्टवर 'अस्मिता शेट्टी, हुमा कुरेशी, गायक हंसराज रघुवंशी यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. हंसराजने कमेंट करत लिहले 'जय शंकर'. त्याचबरोबर इतर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये 'हर हर महादेव' असे लिहिले आहे. काही जणांनी या पोस्टवर हार्ट इमोजी दिले आहे.

'गदर 2' टक्कर देणार 'ओह माय गॉड २' : नुकतेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि वकिलाची भूमिका साकारणाऱ्या यामी गौतमने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. अमित राय दिग्दर्शित 'ओह माय गॉड २' हा परेश रावल आणि अक्षय कुमार स्टारर चित्रपटचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अक्षयने भगवान कृष्णाची भूमिका आधी साकारली होती. अक्षय कुमार आणि यामी गौतमशिवाय या चित्रपटात पंकज त्रिपाठीही आहे. सनी देओलच्या आगामी सिक्वेल 'गदर २'ला टक्कर देण्यासाठी 'ओह माय गॉड २' ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तो 'सूरराई पोत्रू',च्या हिंदी रीमेक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात राधिका मदन आणि परेश रावल देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Tamanna Bhatia : 'जेलर'मधील 'कावला' गाण्याच्या रीलवर थिरकली तमन्ना भाटिया
  2. 'Jawan' Prevue Out: किंग खानने जवान सिनेमाच्या प्रिव्ह्यूची तारीख केली जाहीर; सिनेमा याच दिवशी होणार रिलीज
  3. Rocky Aur Rani Ki Prem Kahaani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या पडद्याआडचे काही खास सीन्स...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.