नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीत देवभक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. बहुतांश लोक कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा ठेऊन असतात आणि याला फिल्मस्टार्स देखील अपवाद नाहीत. अजय देवगण हा शिवप्रेमी असून शंकराचा निस्सीम भक्त आहे. म्हणूनच त्याच्या चित्रपटांच्या नावामध्ये शिवाचा वास दिसतो. अजय देवगणचे भगवान शिवाबद्दलचे नितांत प्रेम आणि भक्ती हे काही गुपित नाही आणि ते त्याच्या ओंकारा ते त्याच्या अलीकडच्या भोलापर्यंतच्या चित्रपटांमध्ये दिसून येते. अनेक चित्रपट, मालिका आणि ऑडिओ मालिकेसह अनेक कलात्मक आणि साहित्यिक कार्ये, शिवाची उल्लेखनीय शक्ती, शहाणपण आणि करुणा दर्शविण्यासाठी त्याच्या नावातून आणि प्रतिमेपासून प्रेरणा घेतात. आपल्या शिवभक्तीबद्दल अजय म्हणतो की, मी लहानपणापासूनच शिवाचा अनुयायी आहे. शिव हा एकमेव देव आहे जो इतर देवांपेक्षा मानव आहे आणि त्याचे स्वतःचे असे सद्गुण आणि दुर्गुण आहेत. इतर देवी-देवता परिपूर्णतेचे प्रतीक आहेत, तर दुसरीकडे, भगवान शिव मदिरा प्राशन, धुम्रपान करायचे आणि बेफाम नृत्य करायचे. मनुष्याप्रमाणेच त्यांच्यातही काही दुर्गुण आहेत, अपूर्णता आहे. शिव भोळा/भोला आहे, तसेच त्याच्या रागाच्या तीव्रतेची कोणीही बरोबरी करू शकत नाही. त्याच्याप्रमाणे सकारात्मक आणि नकारात्मक यांचे संतुलन राखायला मनुष्याने शिकले पाहिजे म्हणजे त्याच्यासोबत कनेक्शन होऊ शकेल.

त्रिशूलचा संदर्भ घेत सिनेमा आकार : अजय देवगण अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित ‘भोला’ काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करतोय. हा सिनेमा तामिळ चित्रपट कैथी चा रिमेक आहे. या चित्रपटात त्याचे नाव भोला असून शिवाच्या जीवनातील आणि त्रिशूलचा संदर्भ घेत सिनेमा आकार घेतो. १० वर्षांचा तुरुंगवास भोगून भोला आपल्या कधीही न पाहिलेल्या मुलीला भेटण्यासाठी निघतो. खरंतर त्याचे आयुष्यातील स्वारस्य संपलेले असते, आस असते ती फक्त आपल्या मुलीला भेटण्याची जी अनाथालयात वाढत असते. परंतु पोलिसांना मदत करण्याच्या प्रयत्नात तो कठीण प्रसंगात गुरफटत जातो इतका की ते सर्व त्याच्या जीवावर बेतते. त्यासुमारास त्याच्यातील शिवा जागा होतो आणि तो अनिष्ट शक्तींचा नायनाट करतो, शिवाचे रौद्ररूप दर्शवितो.

भगवान शिवाच्या मानवी पैलूंचा शोध : याआधी अजय देवगणने शिवाय हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. शिवाय भगवान शिवाच्या मानवी पैलूंचा शोध घेतो. आत्म-शोधाच्या प्रवासात एक गिर्यारोहक, शिवाय, भगवान शिवाच्या अपूर्णता आणि परोपकाराचा अभ्यास करतो. शिवाला समर्पित 'बोलो हर हर' हे शीर्षकगीत, सर्व वाईट गोष्टी दूर करणारा शिव या चित्रपटाच्या केंद्रविषयाला बळकटी देतो. हा चित्रपट भगवान शिव या जटिल आणि आकर्षक देवतेबद्दल विविध पैलू उलगडून दाखवितो.

एक मिश्र जातीचा डाकू : विशाल भारद्वाज दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनीत ओंकारा शेक्सपियरच्या ऑथेल्लो चे भारतीय रूपांतर आहे. भगवान शिवाचे दुसरे नाव ओंकारा वरून त्याचे शीर्षक घेतले आहे. चित्रपटाचा नायक, ओंकारा शुक्ला, जी भूमिका साकारली आहे. अजय देवगणने एक मिश्र जातीचा डाकू आहे जो डॉली मिश्राचे, करीना कपूरने साकारलेली भूमिका, अपहरण करतो आणि पकडण्यापासून वाचण्यात यशस्वी होतो. तथापि, त्याच्या विश्वासू सहाय्यक, लंगडा त्यागी, जी भूमिका साकारली आहे सैफ अली खान ने, त्याच्या विरोधात जातो कारण ओंकारा त्याला पदोन्नती देत नाही. त्यामुळे लंगडा त्याच्याविरुद्ध कट रचतो ज्यामुळे तो स्वतः, त्याचे सहकारी आणि प्रेयसी

डॉलीचे जीवन धोक्यात येते : तीनेक दशकांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हकीकत या चित्रपटात अजय देवगणच्या व्यक्तिरेखेचे नाव शिवा असते. तो एक हिटमॅन असतो आणि मुख्यमंत्र्याला मारण्याची सुपारी घेतो. परंतु त्याच्या हातून वेगळाच माणूस मारला जातो त्यामुळे निराश झालेला तो आपल्या बॉस ला सांगतो की मयत इसमाच्या कुटुंबाला आपण मदत करायला हवी. त्याला पोलीस शोधत असल्यामुळे तो मुंबई ला येतो आणि एकाचे प्राण वाचवितो, जो असतो एक वरिष्ठ पोलीस अधिकारी. पुढे होणारे प्रासंगिक आणि मानसिक बदल चित्रपटातून समोर येतात.

अजय देवगणचे ओटीटी माध्यमावर पदार्पण : अजय देवगणने ओटीटी माध्यमावर पदार्पण केले आणि त्याच्या वेब सिरीज चे नाव होते रुद्र. रुद्र हे शिव शंकराचे वेदांतील नाव आहे. त्या वेब सिरीज ला प्रचंड पाठिंबा मिळाला आणि त्याचा दुसरा सिझन येऊ घातलाय. महत्वाचे म्हणजे अजय देवगण चे शिवा प्रेम फक्त चित्रपटांपुरते नसून त्याच्या छातीवर ओम चिन्हासह शिवाच्या रूपाचा एक मोठा टॅटू तो अभिमानाने मिरवत आहे.
हेही वाचा : Salman Khans advice to Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींमध्ये अडकली शहनाज गिल; सलमान खानने दिला 'मूव्ह ऑन' करण्याचा सल्ला