ETV Bharat / entertainment

अजय देवगण 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी - अजय देवगण शूटिंगदरम्यान जखमी

Ajay Devgn Injured: अजय देवगण मुंबईतील फिल्मसिटीमध्ये 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. चित्रपटामधील अ‍ॅक्शन सीन शूट करत असताना त्याला डोळ्याजवळ दुखापत झाली आहे.

Ajay Devgn Injured
अजय देवगण जखमी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 6:29 PM IST

मुंबई Ajay Devgn Injured : अजय देवगण आगामी 'सिंघम अगेन' या चित्रपटामुळं चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सेटवर अ‍ॅक्शन सीन शूट करताना तो जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर अनेक जखमा असूनही त्यानं शूटिंग थांबू दिलं नाही आणि या जखमी अवस्थेतही तो शूटिंग करतच आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटाचं शूटिंग मुंबईतील विलेपार्ले येथे सुरू आहे. अजय चित्रपटामधील शूटिंग सेटवर अ‍ॅक्शन सीन शूट करत आहे. हे सीन शूट करत असताना त्याला डोळ्याजवळ दुखापत झाली आहे.

अजय देवगणला झाली दुखापत : अजयनं शूटिंगमधून ब्रेक घेतला आणि वैद्यकीय मदत घेतली. अजयच्या अनुपस्थितीत काही काळ शूटिंग थांबवण्यात आलं होतं. अजयनं वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर लगेचच शूटिंग पुन्हा सुरू केलं. 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स', 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटांनंतर सिंघम अगेन हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. आधी या चित्रपटांनी रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई केली आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'च्या शूटिंगचं पहिलं शेड्यूल हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये झालं. रामोजी फिल्ममध्ये या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आला.

'सिंघम अगेन' होणार 'या' दिवशी रिलीज : या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनवर 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती मिळत आहे. 'सिंघम अगेन' हा चित्रपट पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेनं पाहात आहेत. अजय देवगण आणि रोहित शेट्टीला 'सिंघम अगेन' चित्रपटापासून खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होणार की नाही हे येणाऱ्या काळात समजेल. याशिवाय या चित्रपटाबरोबर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' देखील रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' चित्रपट करणार रिलीजच्या चौथ्या दिवशी 'इतकी' कमाई
  2. रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांचं रिसेप्शन होणार 'या' दिवशी
  3. सलमान खानचा 'टायगर 3' 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.