ETV Bharat / entertainment

अभिषेक-ऐश्वर्या विभक्त झाले? या व्हिडिओतून खरं काय ते उघडकीस - Amitabh Bachchan

Aishwarya Rai Bachchan : सेलिब्रेटी कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातमांच्या पार्श्वभूमीवर एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका पापाराझीनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला.

Aishwarya Rai Bachchan
Aishwarya Rai Bachchan
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 10:52 PM IST

मुंबई Aishwarya Rai Bachchan : गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत आहेत. या दोघांचं नात केवळ मुलगी आराध्यामुळेच टिकून असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगली आहे. नुकतेच श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदाचा डेब्यू चित्रपट 'द आर्चीज'च्या स्क्रिनिंगवेळी ऐश सासरच्यांना टाळताना दिसली. यानंतर या चर्चांना आणखी उधान आलं.

बच्चन कुटुंबियांचा व्हिडिओ समोर आला : मध्यंतरी, ऐश्वर्या राय तिचं सासर सोडून आपल्या आईच्या घरी गेली असल्याचं वृत्त आलं होतं. यामुळे बच्चन कुटुंबियांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर आता बच्चन कुटुंबियांचा एक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या अ‍ॅन्युअल डेचा आहे. एका पापाराझीनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला.

किंगखान कुटुंबियांसोबत दिसला : या व्हिडिओमध्ये बॉलीवूडचा किंगखान शाहरुख त्याच्या कुटुंबासह दिसतोय. व्हिडिओमध्ये किंग खान पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानसोबत स्कूलमध्ये जाताना दिसतोय. यावेळी गौरी आणि सुहाना एथनिक लूकमध्ये दिसल्या. तर किंग खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये स्पॉट झाला. कार्यक्रमासाठी करण जोहर आणि अपूर्व मेहतासोबत करीना कपूर देखील पोहोचली होती. या वेळी शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत कॅमेऱ्यात कैद झाला.

ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले : या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसली. ती कार्यक्रमासाठी आई वृंदा रायसोबत पोहोचली. तर अभिषेक बच्चन वडील अमिताभ बच्चन आणि पुतण्या अगस्त्य नंदासोबत आला. कारमधून उतरल्यानंतर ऐश्वर्यानं कोणाला तरी पाहून हास्य केलं आणि त्यानंतर ती बच्चन कुटुंबात सामील झाली. यावेळी ती तिच्या सासरच्यांशी बोलताना दिसली. अगस्त्य आल्यानंतर तिनं त्याचा गाल पकडला आणि त्याच्या शेजारी उभी राहिली. जेव्हा ते शाळेच्या आत जात होते तेव्हा अभिषेक ऐश्वर्याच्या गळ्यात हात घालून बोलताना दिसला.

हे वाचलंत का :

  1. "मी दारु पीत नाही", म्हणत सनी देओलनं सांगितलं निर्व्यसनी असल्याचं कारण
  2. अगस्त्य नंदा आणि खुशी कपूरची खिल्ली उडवणारी पोस्ट चुकून लाईक केल्यानंतर रवीना टंडनची गूढ पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.