मुंबई : अभिनेता अमित साध म्हणाला, मला पोलिसांच्या कथा आवडतात. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला खात्री पटली की ही केवळ एन्काउंटर स्पेशालिस्टची कथा नाही तर त्याच्या गुंतागुंतीच्या मानसशास्त्राशी संबंधित आहे. अप्रतिम लेखनाने मी प्रभावित झालो. जेव्हा मी दिग्दर्शक सचिनशी संपर्क साधला तेव्हा मी त्याला भेटलो. जेव्हा त्याने व्यक्तिरेखा सांगायला सुरुवात केली, तेव्हा मला माहित होते की मला हा चित्रपट (role of Encounter Specialist) करायचाच आहे.
या चित्रपटासाठी तो सर्वात योग्य अमित साध : दिग्दर्शक सचिन सराफ याने सांगितले की, मी अमित साध (amit sadh) यांच्याशी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदा बोललो तेव्हा त्यांनी मला स्क्रिप्ट इमेल करण्यास सांगितले. कारण ते आऊटडोअर शूटमध्ये बिझी होते. परंतु दोनच दिवसांत त्यांनी होकार कळवला आणि मला सांगितले की, त्यांना स्क्रिप्ट आवडली आहे. यूव्ही फिल्म्सचे निर्माते प्रदीप रंगवानी हे अतिशय आध्यात्मिक व्यक्ती आहेत आणि ते नेहमीच सामाजिकदृष्ट्या समर्पक विषय निवडतात. हा चित्रपटही त्याच मार्गावरील आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. ब्रिथमधील (brilliant success of breath) एक धारदार आणि कठोर गुन्हे शाखेचा अधिकारी म्हणून अमित साधच्या अभिनयाने मी आणि निर्माते रंगवानी प्रभावित झालो होतो. या चित्रपटासाठी तो सर्वात योग्य आहे असे आम्हाला वाटले.
चित्रपट हे एक उत्तम व्यासपीठ : यूव्ही फिल्म्सचे संस्थापक, पॉल या नावाने प्रसिद्ध असलेले प्रदीप रंगवानी यांना चित्रपटांच्या माध्यमातून अर्थपूर्ण आणि अनोख्या कथा सादर करण्याची प्रचंड आवड आहे. आपल्या समाजातील लोकांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल आपले मत मांडण्यासाठी चित्रपट हे एक उत्तम व्यासपीठ आहे. तथापि ते हुशारीने आणि संवेदनशीलतेने केले पाहिजे. यूव्ही फिल्म्स दरवर्षी 4 चित्रपट बनवण्याच्या दृष्टीकोनातून काम करत आहे, ज्यात 20 चित्रपट एकत्र आहेत. पुढील 5 वर्षे हे चित्रपट प्रासंगिक असतील आणि आपल्या समाजाची सद्यस्थिती प्रतिबिंबित करतील, असे रंगवाणी म्हणतात.